Pune News : खराडी येथील खासगी जागेत ३५० वृक्षांची कत्तल, जागा मालकावर फौजदारी गुन्हा
खराडी येथील सर्व्हे नंबर १४०/१/२ वरील एका खासगी कंपनीने त्यांच्या आवारातील सुकलेल्या २६ वृक्ष काढण्याची परवानगी महापालिकेच्या (PMC Pune) उद्यान विभागाकडे मागितली होती. मात्र , कंपनीने दहा पंधरा नव्हे तर तब्बल ३५० वृक्ष जेसीबीचा सहाय्याने मुळासकट काढुन टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.