पुणे: तीस वर्षांपूर्वी दुरुस्ती अर्ज देऊनही मिळाले नाही मतदान ओळखपत्र

लष्कर परिसरातील सेंट व्हिन्सेट मार्गावरील वॉल्टर सलढाणा यांच्या मतदार ओळखपत्रावरील नावात अनेक चुका असल्यामुळे त्यांनी मतदान ओळखपत्र दुरुस्तीसाठी अर्ज दिला होता.

तीस वर्षांपूर्वी दुरुस्ती अर्ज देऊनही मिळाले नाही मतदान ओळखपत्र

पुणे: लष्कर परिसरातील सेंट व्हिन्सेट मार्गावरील वॉल्टर सलढाणा यांच्या मतदार ओळखपत्रावरील नावात अनेक चुका असल्यामुळे त्यांनी मतदान ओळखपत्र दुरुस्तीसाठी अर्ज दिला होता. मात्र, गेली तीस वर्षे अनेक वेळा पाठपुरावा करूनसुध्दा त्यांना अद्याप दुरुस्त ओळखपत्र मिळाले नाही. त्यांचे वय आता ८५ वर्षांचे आहे. आता तरी मला मतदान करता येईल का, अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. 

लष्कर परिसरातील वॉल्टर सलढाणा यांना १९९४ मध्ये मतदान ओळखपत्र मिळाले. मात्र या ओळखपत्रात देवनागरी आणि इंग्रजी भाषेत अनेक चुका होत्या. Walter ऐवजी Volatar तर Saldanha ऐवजी Saldanna अशा इंग्रजीतील चुका होता. मराठीत ‘वॉल्टर’ ऐवजी ‘वॉलटेंर तर सलढाना ऐवजी सलदाना असे चुकीचे लिहिले गेले होते. त्यामुळे मराठीसह इंग्रतील नाव व आडनाव यामधील चुकांमुळे वॉल्टर सलढाणा यांनी मतदान ओळखपत्र स्वीकारलेच नाही. उलट त्यांनी ते ओळखपत्र १७ नोव्हेंबर १९९४ ला पोचपावतीसह परत केले. त्यांनी ओळखपत्रातील दुरुस्ती केल्यानंतर मतदान ओळख पत्र द्या, अशी विनंती केली. त्यासाठी त्यांनी इंग्रजी, मराठी भाषेतील शुद्धलेखनासह आपले संपूर्ण नाव, पत्ता अर्जात नमूद केले होते. 

दरम्यान, त्यांनी दोन ते तीन वेळा मतदान ओळखपत्राबाबत चौकशी केली. त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी ओळखपत्राचा हट्ट सोडला. हे ओळखपत्र नसल्यामुळे त्यांना आधारकार्डसुद्धा अद्याप मिळाले नाही. त्यामुळे त्यांना सरकारी फायदे कोणतेही मिळाले नाहीत. मात्र, त्यांची अनेक ठिकाणी गैरसोय होत आहे. भारतीय नागरिक असूनदेखील त्यांना जगातील सर्वात मोठ्या लोकशाही उत्सवात सहभागी होत येत नसल्याची त्यांना खंत आहे. आता त्यांचे वय ८५ वर्ष झाले आहे. त्यामुळे त्यांना मतदान ओळखपत्र मिळाले तर मतदान करता येईल, अशी आशा आहे. 

मतदान ओळखपत्र मिळणार म्हणून उत्सुक होतो. जेव्हा माझ्या हातात ओळखपत्र पडले, तेव्हा त्यातील मराठी, इंग्रजीतील चुका बघून दु:ख झाले. माझे मराठी व इंग्रजीतील नामकरण वेगळेच झाले होते. त्यामुळे ते मी स्वीकारले नाही. उलट दुरुस्तीसाठी तत्काळ शुद्धलेखन करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अर्ज दिला.

- वॅाल्टर सलढाणा

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest