Pune: भुयारी मार्गात दीड दिवस पडून होता मृतदेह!

पुणे: महापालिकेने भुयारी मार्ग केवळ शोभेसाठी बनविले आहेत की काय, अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे. या भुयारी मार्गांची स्वच्छता राखली जात नसल्याने फुलेनगर येथील भुयारी मार्गात साठलेल्या मैलापाण्यामुळे पाय घसरून एकाचा

Alandi Road

संग्रहित छायाचित्र

साठलेल्या मैलापाण्यामुळे पाय घसरून मृत्यू, वेळीच माणुसकी आली असती धावून तर वाचला असता प्राण

पुणे: महापालिकेने भुयारी मार्ग केवळ शोभेसाठी बनविले आहेत की काय, अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे. या भुयारी मार्गांची स्वच्छता राखली जात नसल्याने फुलेनगर येथील भुयारी मार्गात साठलेल्या मैलापाण्यामुळे पाय घसरून एका ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांचा मृतदेह दीड दिवस भुयारी मार्गात पडून होता.  सुरक्षेसाठी नियम पाळत भुयारी मार्गातून जाण्याची अशी  जीवघेणी शिक्षाच त्यांना जणू मिळाली. (Pune News)

अविनाश जोशी (वय ५३) शुक्रवारी (दि. ३) रात्री आळंदी रस्त्यावरील भुयारी मार्गाने बीआरटी थांब्यावर जात होते. भुयारी मार्गात प्रचंड अस्वच्छता, मैलापाण्याचे साम्राज्य असल्याने सहसा या मार्गाचा कोणी वापर करीत नाहीत. अविनाश एकटेच भुयारी मार्गातून जात असताना त्यांचा पाय घसरून ते खाली पडले. ते पडल्यानंतर त्यांच्या मदतीला कोणीच आले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांचा मृतदेह दीड दिवस भुयारी मार्गात पडून होता. 

आळंदी रस्त्यावरील फुलेनगर येथील शंभर मीटर अंतरावर लालूजी गोगले भुयारी मार्ग व पादचारी उड्डाणपूल आहे. देशात स्वच्छ सर्वेक्षणात दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या पुणे शहरातील हा भुयारी मार्ग म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. भुयारी मार्गात दिवे नाहीत. त्यामुळे दिवसासुद्धा कोणी या भुयारी मार्गाचा वापर करत नाहीत.  वारंवार तक्रार करूनही भुयारी मार्गातील स्वच्छता होत नाही. याची तक्रार अनेक वेळा स्थानिकांनी केली आहे. भुयारी मार्ग बंद करा अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशाराही काँग्रेसच्या वडगाव शेरी मतदारसंघाच्या अध्यक्षा शिवानी माने यांनी दिला आहे. 

अपंग आईचा श्रावणबाळ...

फुलेनगर येथील अविनाश जोशी एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होते. वृद्ध आईचे दोन्ही पाय काही कारणांमुळे कापले होते. त्यामुळे आईची  संपूर्ण सुशृषा अविनाश करत होते. वडील वृद्ध असल्याने दोघांची जबाबदारी अविनाशवर होती. त्यांचे परिसरात श्रावणबाळ म्हणून कौतुक व्हायचे. अपघातानंतर ते  घरी न आल्याने वृद्ध माता-पित्याचे हाल झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. शेजारी धीर देतात. मात्र, आईच्या जेवणाची वेळ व औषधांची वेळ टळत होती. वृद्ध दाम्पत्याचे सर्व लक्ष दरवाजाकडे होते. अविनाश कधी येऊन, कधी उठवेल, कधी चहा, जेवण देईल असे वाटत होते. सर्वांनी शोधाशोध केल्यानंतर अविनाश यांचा मृत्यू झाल्याचे इतरांना कळले. मात्र, त्यांनी लगेच आई-वडिलांना कळविले नाही. मात्र शेवटी ही धक्कादायक बातमी समजल्यावर त्यांनी हंबरडा फोडला. 

"अविनाश हा बालमित्र होता. तो एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. आई-वडिलांकडे लक्ष देण्यासाठी त्याने नोकरी सोडली होती. तो आर्थिक विवंचनेत होता. मात्र आई-वडिलांची सेवा तो मनापासून करीत होता. त्याचा मृत्यू झाल्यामुळे वृद्ध आई-वडिलांवर आभाळ कोसळल्यागत झाले आहे.”

- उमेश माने, मित्र

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest