बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या सराईतास बेड्या

लोकसभा निवडणुकीच्या काळात पुणे शहरात बेकायदेशीर अग्निशस्त्रे सापडण्याचे प्रकार सुरूच आहेत. येरवडा पोलीस तपास पथकाने एका सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे दोन पिस्तुल व चार काडतुसे (राऊंड) नुकतेच हस्तगत केले.

संग्रहित छायाचित्र

येरवडा पोलिसांकडून दोन पिस्तुल, चार काडतुसे जप्त ; स्वसंरक्षणासाठी पिस्तुल बाळगल्याचा आरोपीचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या काळात पुणे शहरात बेकायदेशीर अग्निशस्त्रे सापडण्याचे प्रकार सुरूच आहेत. येरवडा पोलीस तपास पथकाने एका सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे दोन पिस्तुल व चार काडतुसे (राऊंड) नुकतेच हस्तगत केले.

लोकसेभेचा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील बड्या गुन्हेगारांची परेड घेतली होती. अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांचीदेखील हजेरी आयुक्तांनी घेतली होती. तरीसुद्धा गेल्या आठवड्यात सलग चार दिवस गोळीबाराच्या घटना शहर परिसरात घडल्या होत्या. येरवड्यातील एका गोळीबाराच्या घटनेत विकी चंडालिया ( वय ३० वर्षे) याचा मृत्यू सुद्धा झाला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या येरवडा पोलीस तपास पथकाने एका सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे दोन पिस्तुल व चार काडतुसे (राऊंड) हस्तगत केले आहे. अभिषेक नारायण खोंड (वय २३ वर्षे, रा. लोहगाव रोड, वाघोली) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘खोंड याच्यावर यापूर्वी येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तो मोक्काच्या गुन्ह्यात काही वर्षे येरवडा कारागृहात होता. सहा महिन्यापूर्वी तो येरवडा कारागृहातून बाहेर आला होता. येरवडा पोलीस तपास पथकातील पोलीस हवालदार कैलास डुकरे व पोलीस अंमलदार सुशांत भोसले हे गुन्हेगार तापसत असताना त्यांना येरवडा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील खोंडची माहिती मिळाली. तो वडगावशेरी येथील मुळा-मुठा नदीपात्रा जवळील मोकळ्या जागेत कोणाची तरी वाट बघत थांबला असल्याची माहिती मिळाली. तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून खोंड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन राऊंड हस्तगत केले. त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.’’

पोलीस कोठडीत तपासादरम्यान त्याच्याकडून आणखी एक पिस्तुल आणि दोन काडतुसे हस्तगत करण्यात आली. आरोपीकडून एकूण ६५ हजार ५०० रूपये किंमतीचे दोन पिस्तुल व चार काडतुसे हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

शहर तसेच येरवड्यातील गोळीबाराच्या घटनेमुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. याच दरम्यान पूर्वी येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerwada Police Station) खुनाच्या आरोपाखाली गुन्हेगाराला मकोका अंतर्गत येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. खोंड सहा महिन्यापूर्वी कारागृहातून जामिनीवर सुटला होता. गुन्हेगारी टोळीकडून त्याला धोका असल्यामुळे त्याने मध्यप्रदेश मधून दोन पिस्तुल खरेदी केले होते. त्याला नुकतेच ताब्यात घेतले आहे.

- संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस ठाणे 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest