पुणे: भाग्यश्रीच्या खुनाची काही दिवस आधीपासूनच तयारी! अपहरण करण्यासाठी भाड्याने घेतली होती मोटार

विमाननगर परिसरातून अपहरण आणि नंतर खून झालेल्या भाग्यश्री सूर्यकांत सुडेचे आरोपी तिच्या खुनासाठी काही दिवस आधीपासून तयारी करीत होते. तिचा खून कसा करायचा? त्यानंतर मृतदेह नष्ट करायचा कसा? तो कसा पुरायचा?

Bhagyashri Sude Murder Case

भाग्यश्रीच्या खुनाची काही दिवस आधीपासूनच तयारी! अपहरण करण्यासाठी भाड्याने घेतली होती मोटार

आरोपींना १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी; तपासासाठी तीन पथके रवाना

विमाननगर परिसरातून अपहरण आणि नंतर खून झालेल्या भाग्यश्री सूर्यकांत सुडेचे आरोपी तिच्या खुनासाठी काही दिवस आधीपासून तयारी करीत होते. तिचा खून कसा करायचा? त्यानंतर मृतदेह नष्ट करायचा कसा? तो कसा पुरायचा? त्यासाठी खड्डा कधी खोदायचा? खड्डा खोदण्यासाठी साधनांची जुळवाजुळव कशी करायची, याचे प्लॅनिंग तीन आरोपींनी केल्याचे दिसते. त्यामुळे पैशांसाठी हा खून नसून आणखी काही कारण यामागे आहे का, असे प्रश्न भाग्यश्रीच्या मैत्रिणींसह पोलिसांना पडले आहेत. (Bhagyashri Sude Murder Case)

भाग्यश्रीचा दोन वर्षांपासूनचा मित्र शिवम  फुलवळे (Shivam Phulavale) हा प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे. तो वाघोलीतील आलिशान अशा ॲाक्सिहेवन सोसायटी राहात होता.  त्याचा मित्र सुरेश इंदोरे (Suresh Indore) हासुद्धा आयटी डिप्लोमाधारक असून तो मुंबई येथे नोकरीला आहे. यासह सागर जाधव (Sagar Jadhav) हा नवी मुंबईत नोकरीला आहे. त्यामुळे भाग्यश्रीचे अपहरण व खून पैशासाठी झाले, हे शंकास्पद असल्याची चर्चा आहे.  

भाग्यश्रीचे ३० मार्चला रात्री नऊच्या सुमारास विमाननगर येथील फिनिक्स मॉल येथून शिवमने अपहरण केले त्यासाठी त्याने मोटार भाड्याने घेणे, दोन मित्र सोबत असणे, तिचा खून करण्यासाठी वापरलेली पद्धत, तिच्या तोंडाभोवती सेलो टेप गुंडाळणे, तिचा मृतदेह नगर जिल्ह्यातील कामरगाव येथील खिंडीत खड्डा खोदून पुरणे, तत्पूर्वी मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळणे या सर्व बाबी अनुत्तरित आहेत. भाग्यश्रीचा खून करण्याआधी कामरगाव येथे खड्डा खोदणे, पेट्रोल, टिकाव, फावडे, घमेले आदी साहित्याची जुळवाजुळव करणे या सर्व गोष्टी थंड डोक्याने केल्याची शक्यता वाटते.

सहा महिन्यांपासून भाग्यश्री मैत्रिणीसोबत साकोरेनगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून भाड्याने राहण्यासाठी आली होती. ती गेले दोन वाघोलीत राहत होती. त्यामुळे ती विमानगर येथे का राहण्यास आली? तिच्या  रूममधील मैत्रिणीने तिला फिनिक्स मॉलबाहेर एकटीलाच सोडणे, त्यानंतर मैत्रीण घरी रात्रभर न आल्याने कोणासही संपर्क न करणे अशा अनेक प्रश्न शंकास्पद आहेत.

एकतर्फी प्रेमातून खुनाची शक्यता

भाग्यश्रीचा खून पैशासाठी नसून तो एकतर्फी प्रेमातून झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. शिवमने मित्राच्या मदतीने भाग्यश्रीचा खून केला असण्याची शक्यता आहे. खून केल्यानंतर सर्वजण आपापल्या गावी गेले होते. त्या ठिकाणी पोलीस तपासाला गेले आहेत. 

भाग्यश्रीच्या खुनातील तीनही संशयित आरोपींना न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपासासाठी नांदेड, लातूर, मुंबई या ठिकाणी पोलीस पथके पाठविली आहेत. 
- आनंदराव खोबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस ठाणे 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest