संग्रहित छायाचित्र
पुणे शहरात गेल्या साडेतीन वर्षांत प्रादेशिक परिवहन कार्यालयात ( आरटीओ) २५ पोर्शेकारची नोंद झाली आहे. शहरातील बांधकाम व्यवसायिक , उद्योजक तर काही कंपन्यांच्या मालकीच्या या कार असल्याचे दिसून येते. पोर्शे कार नंतर जॅग्वार, फेरारी आणि लॅम्बोर्गिनी या कार खरेदी करण्याकडे पुणेकरांचा कल असल्याचे दिसून येते. (Pune Porsche Cars)
कल्याणीनगर येथील ‘हिट ॲंड रन ’ प्रकरणात अल्पवयीन आरोपीने पोर्शे स्पोर्ट कार बेदरकारपणे चालवून दोन संगणक अभियंत्यांना चिरडले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणे शहर, राज्य नव्हे तर देशभर अपघाताबरोबरच पोर्शे स्पोर्ट कारमुळे चर्चेत आले. त्यामुळे पोर्शे स्पोर्ट कार शहरात किती आहेत याची माहिती पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात घेतली. साडेतीन वर्षांत २५ पोर्शे स्पोर्ट कारची खरेदी झाल्याचे दिसून येते. पोर्शे केारप्रमाणेच पुणेकरांना जॅग्वार, फेरारी व लॅम्बोर्गिनी या स्पोर्ट कारबरोबर शेकडो पुणेकरांनी ‘बीएमडब्ल्यू’ची खरेदी केल्याचे दिसून येते. शहरातील बांधकाम व्यवसायिक, विविध कंपन्यांनी, उद्योजकांनी हे स्पोर्ट कार खरेदी केले असले तरी मालकी फक्त कंपनीची आहे. या स्पोर्टकारची स्टेअरिंग मात्र, गर्भश्रीमंत कुटुंबातील लाडक्या बाळांच्या हाती आहे.
अनेक स्पोर्ट कारवर सामान्य वाहनांप्रमाणे नंबर प्लेट आहेत. त्यामुळे या वाहनांकडून जर अपघात झाला तर सहज पळ काढता येऊ शकते. कोणाच्याही लक्षात नंबर प्लेट राहू शकत नाही, असा काही जणांचा समज दिसतो. तर काहींनी ९९९९, ७७७, ९४९५, ६४६४,००९९, ०००७ असे व्हीआयपी नंबर घेतले आहेत.
मालकांची नावे गोपनिय
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात २०२१ मध्ये तीन पोर्शे स्पोर्ट कार घेतल्याची नोंद आहे. २०२२ मध्ये दहा, २०२३ मध्ये सात तर २०२४ मध्ये एप्रिल महिन्यांपर्यंत चार पार्शे स्पोर्ट खरेदी केल्याची नोंद आहे. २०२१, २०२२ व २०२४ यावर्षी कोणी, कोणी पोर्शे कार खरेदी केली यांची नावे आरटीओने देण्यास स्पष्टपणे नकार दिला. एम वाहन या मोबाईल अपवर त्यांची नावे शोधा असे आरटीओकडून सांगण्यात आले. मात्र, या अपवर ही महागडी खरेदी केलेल्या मालकांची नोंद नाही. दुचाकी व इतर. मोटारींची माहिती तत्काळ मिळत असल्याचे दिसून येते.