पुणे: शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्गाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त!

येत्या गणेश चतुर्थीला (७ सप्टेंबर) पुणेकरांच्या सेवेला शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा बहुप्रतीक्षित भुयारी मेट्रो मार्ग सुरू करण्यात येणार आहे.

Pune Metro

संग्रहित छायाचित्र

सर्व स्टेशन होणार सुरू; पुणेकरांना देवदर्शन, शॉपिंगसह नाटक पाहणे शक्य

येत्या गणेश चतुर्थीला (७ सप्टेंबर) पुणेकरांच्या सेवेला शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा बहुप्रतीक्षित भुयारी मेट्रो मार्ग सुरू करण्यात येणार आहे.

यासह पुणे महामेट्रोचे (Pune Metro) सर्व स्थानके कार्यरत होणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना आता मेट्रोचा प्रवास करीत दगडुशेठ गणपतीचे दर्शन, लक्ष्मीरोड वरील शॉपिंगसह बालगंधर्वला नाटक पाहणे शक्य होणार आहे. येत्या गणेशोत्सवात पुणेकरांसह पर्यटकांना वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट दरम्यान मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

येत्या ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. त्या दिवशी शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट दरम्यान देशातील दुसरा (मुठा) नदीखालून जाणारा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. जमिनीच्या शंभर फूट खालून हा मेट्रो मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाबाबत पुणेकरांना मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सवातच पुणे मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

स्वारगेट येथील मेट्रो स्थानकाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट पुणे मेट्रो मार्ग संपूर्ण तयार झाल्यानंतर मेट्रो अवघ्या साठ सेकंदाला प्रवाशांच्या सेवेला उपलब्ध होणार आहे. कसबा गणपती, दगडूशेठ गणपती, जोगेश्‍वरी मंदिर असो की स्वारगेट येथील महालक्ष्मी मंदिराला भाविकांना दर्शनासाठी जाता येणार आहे. यासह लक्ष्मी रस्त्यावरील खरेदी असो की बालगंधर्वला नाटक, मंगला थिएटरला सिनेमा पाहणे पुणेकरांसह पर्यटकांनासुद्धा सोईचे ठरणार आहे. मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे पुणेकरांना मोटार किंवा दुचाकी लावण्यासाठी वाहनतळ शोधण्याची गरज लागणार नाही. वातानुकूलित मेट्रोमधून प्रवास करून खरेदीचा आणि नाटक सिनेमाचा आस्वाद घेता येणार आहे.

सायकलप्रेमींना सायकलसह मेट्रोमधून प्रवास करता येणार

वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशा दोन मार्गावर मेट्रो धावणार असल्यामुळे सायकलप्रेमींना आपल्या सायकलसह मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. सायकलस्वार जवळच्या मेट्रो स्थानकावर सायकलने येतील. त्यानंतर लिफ्टने मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवरून ते सायकलसह मेट्रो मधून प्रवास करून निश्‍चित थांब्यांवर जातील. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, आयटी प्रोफेशनल्स यांना फायदा होऊ शकतो.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे महिला, मुलींसाठी मेट्रो प्रवास सुरक्षित

महिलांना सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवास करताना अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते. बस असो की लोकल ट्रेन, यामध्ये प्रवास करताना महिलांची छेडछाड होते. गर्दीचा फायदा घेऊन अनेकजण महिलांना त्रास देतात. सार्वजनिक ठिकाण असल्यामुळे महिला याची तक्रार करण्याची धाडस दाखवित नाहीत. मात्र आता पुणे मेट्रोच्या स्थानकांसह रेल्वेतील असंख्य कॅमेऱ्यांमुळे युवती, महिला आणि विद्यार्थिनींना मेट्रोचा प्रवास सुरक्षित असणार आहेत.

मेट्रोच्या परिसरात गैरवर्तन करणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्षामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे ते तत्काळ पोलिसांना माहिती देतील. पोलीस संबंधित व्यक्तीचे छायाचित्र घेऊन त्याला ताब्यात घेऊन त्याची थेट रवानगी पोलीस ठाण्यात करतील. त्यामुळे महिला आणि मुलींच्या छेडछाडीला आळा बसणार आहे.

पुणेकर घेणार भुयारी मार्गाचा आनंद

शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट ते स्वारगेटदरम्यान तीन स्थानके असणार आहेत. यामध्ये बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी स्थानके असणार आहेत. हा मेट्रो मार्ग मुठा नदीच्या शंभर मीटर खालून जात आहे. यासह या मार्गावरील कोणत्याच इमारतीच्या किंवा घरांच्या पायाला धक्का न लागता मेट्रो मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकर प्रवासादरम्यान या भुयारी मार्गाचा आनंद घेणार आहेत.

सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो भुयारी मार्ग सप्टेंबरमध्ये अर्थात गणेशोत्सवात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मेट्रो स्थानकावरील कामे पूर्ण करीत आहोत.  

- हेमंत सोनवणे, संचालक, महामेट्रो

Shivajinagar civil court to Swargate subway pune metro

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest