अखेर मेट्रोच्या पिलरमधून रस्त्यास परवानगी, वनाझ ते रामवाडी दरम्यान रस्त्यासाठी १८ मीटर जागा उपलब्ध
येरवडा : वनाझ ते रामवाडी दरम्यान असणाऱ्या मेट्रो मार्गावरील पिलरच्या मधून रस्ता करण्यासाठी महामेट्रोने महापालिकेला परवानगी दिली आहे. त्यामुळे मेट्रोच्या पिलरच्या मधून १८ मीटर जागा रस्त्यासाठी उपलब्ध होणार असल्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून थोडी सुटका होणार आहे.
येरवडा येथील मेट्रो स्थानक जीन्याचा पीलर रस्त्याच्या मधोमध येत असल्यामुळे येथील काम थांबले आहे. तांत्रिकदृष्ट्या जीनाचा पीलर काढता येतो का याची पाहणी करण्यासाठी महामेट्रोचे अधिकारी व महापालिकेचे अधिकारी आहे होते. यावेळी महापालिकेचा पथ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव यांनी यावेळी मंहामेट्रोने मेट्रो पीलरच्या मधून रस्त्या तयार करण्यासाठीची परावानगी पत्र महापालिकेला दिल्याचे सांगितले.
धारव म्हणाले, ‘‘खराडी ते शिवणे दरम्यान रस्ता कल्याणीनगर ते येरवडा गुंजन चौका पर्यंत रखडला आहे. येथील भूसंपादनाचा विषय होता. मात्र., महामेट्रोने मेट्रोच्या पीलरच्या खालील जागा रस्त्यासाठी दिल्याने अनेक ठिकाणच्या रस्त्यांचा प्रश्न सुटणार आहे. उदहारणार्थ कल्याणीनगर ते गुंजन चौका दरम्यान खराडी ते शिवणे रस्ता मेट्रोच्याप पीलर मधून तयार करता येईल. पीलर मधील जागा ।८ मीटर असल्याते रस्त्याच्या तीन मार्गिका तयार होऊ शकतात. यासह वनाझ ते रामवाडी दरम्यान रस्त्यावर असणाऱ्या पीलरमधील जागा मिळाल्य्याने वाहतूक कोडींची समस्या सुयू शकते.’’
येरवडा मेट्रो स्थानक जीना रस्त्यावरून काढणार
येरवडा मेट्रो स्थानकाचा जीना रस्त्याच्या मधोमध आल्याने येथील नागरिकांनी आक्षेप घेतला होता. दीड महिन्यापूर्वी माजी नगरसेवक ॲढ अविनाश साळवे, सामाजिक कार्यकर्ते डॅनिअल लांडगे यांनी जीन्याचे काम थांबविले होते. त्यामुळे महामेट्रेाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल मोहळकर यांनी येरवडा मेट्रो स्थानकाला भेट देऊन येथील जीना तांत्रिकदृष्ट्या हलविता येईल का याची पाहणी केली. यावेळी मेटृो प्रवाशांच्या दृष्टीने सायकल ट्रक, सायकल थांबा, पादचारी मार्ग यासाठी जागा राखीव ठेवणार असल्याचे मोहळकर यांनी सांगितले.
महामेट्रो पर्णकुटी चौकात नवीन शेतकरी पुतळा बसविणार
पर्णकुटी चौकात पेट्रो पीलरला अहथळा ठरणत असल्यामुळे येथील शेतकरी पुतळा काढण्यात आला. यावेळी पुतळ्याची पहझड झाली. त्यामुळे महामेट्रोने २५ लाख रुपये खर्च करून नवीन शेतकरी पुतळा बनविण्यात आले आहे. हा पुतळा नवीन वर्षांत पर्णकुटी चौकात बसविण्यात येणार असल्याचे मोहळकर यांनी सांगितले.
पर्णकुटी चौकातील अनाधिकृत वाहतूक बेट काढणार
पर्णकुटी चौकात अनाधिकृत वाहतूक बेट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे दररोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होते. हे बेट कमी केल्यास वाहतूक सुरळीत होईल, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.