पुणे: बचतगटाचे थकीत पैसे घेण्यास गेलेल्या महिलेवर सोडले कुत्रे
पुणे: बचतगटाचे थकीत पैसे घेण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर सोडलेल्या कुत्र्याने जोरदार चावा घेतल्याने सदर महिला गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार येरवड्यातील गांधीनगरमध्ये घडला.
कामराजनगर येथील सुनीता कुमावत (वय ४० वर्षे) या बचतगटातील थकीत पैसे घेण्यासाठी रविवारी (३० जून) गांधीनगर येथे ज्योती रघुनाथ शिर्के (वय ४२) यांच्याकडे गेल्या होत्या. यावेळी कुमावत आणि शिर्के यांच्यामध्ये वादावादी झाली. यावेळी ज्योती शिर्के व मिहिर शिर्के यांनी कुमावत यांच्या अंगावर घरातील दोन पाळीव कुत्रे सोडले. यापैकी एका काळ्या रंगाच्या कुत्र्याने कुमावत यांच्या उजव्या हाताच्या कोपराला तीन ते चार चावे घेतले. या प्रकरणात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
संतापजनक गोष्ट म्हणजे, कुत्र्याने चावा घेतल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कुमावत यांनी मदतीसाठी शिर्के यांना विनवणी केली. तेव्हा शिर्के यांनी घराचा दरवाजा बंद करून घेतला. गंभीर जखमी झालेल्या कुमावत यांच्यावर ससून रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर पुढील ४८ तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले आहे.
कामराजनगर येथील सुनीता संजू कुमावत (वय ४० वर्षे, व्यवसाय नोकरी) या बचत गटातील थकीत पैसे घेण्यासाठी रविवारी गांधीनगर येथील आरोपी ज्योती रघुनाथ शिर्के (वय ४२ वर्षे) यांच्याकडे गेल्या होत्या. त्यांच्यामध्ये थकीत पैशांवरून वादावादी झाली. यावेळी ज्योती शिर्के व मिहिर शिर्के (वय २३ वर्षे) यांनी कुमावत यांच्या अंगावर घरातील दोन पाळीव कुत्रे सोडले. दोन कुत्र्यांपैकी एका काळ्या रंगाच्या कुत्र्याने कुमावत यांच्यावर झेप घेतली. त्यांच्या हाताच्या कोपराला तीन ते चार चावे घेतले. यावेळी जखमी झालेल्या कुमावत यांनी ज्योती शिर्के यांना मदतीसाठी याचना केली. मात्र, ज्योती शिर्के यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला. कुमावत यांनी स्वत:ला कसेबसे वाचवून तेथून घरी आल्या. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर ॲंटिरेबीजचे इंजेक्शन दिले गेले. मात्र, रेबीजची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
कुमावत रविवारी सकाळी नऊच्या सुमारास शिर्के यांच्या घरी बचतगटांची थकीत रक्कम मागण्यासाठी गेल्या असता आरोपी ज्योती शिर्के यांनी कुमावत यांच्याशी वादविवाद केला. ज्योती शिर्के यांनी त्यांचा भाचा आरोपी मिहिरसह कुमावत यांना दमदाटी केली. त्यानंतर ज्योती व मिहिरने संगनमताने करून त्यांच्या घरातील दोन पाळीव कुत्री कुमावत यांच्या अंगावर सोडली. शिर्के यांच्या दोन पाळीव कुत्र्यांपैकी काळ्या रंगाचा मजबूत असलेल्या कुत्र्याने कुमावत यांच्या अंगावर झेप घेतली व त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराला जोराने तीन ते चार वेळा जोराने चावा घेतला. या चाव्यामुळे कुमावत यांच्या उजव्या हाताच्या कोपराला गंभीर जखम होऊन त्यातून रक्त आले. कुमावत यांनी ज्योतीला ‘‘तुझं कुत्रं चावत आहे, मला त्याच्या तावडीतून सोडव,’’ अशी विनवणी केली असता, ज्योती शिर्के यांनी त्यांची कोणतीही मदत न करता, उलट तिचे घराचा दरवाजा आतून लावून घेतला.
घटनास्थळी येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, साहाय्यक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी भेट दिली. आरोपी ज्योती शिर्के व मिहिर शिर्के यांना अटक केली. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे करीत आहेत.