Yerwada Jail : महिला कैद्यांचे 'फिटे अंधाराचे जाळे', चौदा वर्षांनंतर झाली १० कोटी रूपयांची तरतूद

येरवडा महिला खुले कारागृह हे देशातील पहिले खुले कारागृह आहे. मात्र १४ वर्षानंतर महिला खुल्या कारागृहाला मुहूर्त मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग ( पीडब्ल्यूडी) १० कोटी रूपये खर्च करून है खुले कारागृह बांधत आहे. त्यामुळे याठिकाणी उंच भिती, अंधार कोठड्या, कोंदट बराकी दिसणार नाहीत, महिला कैद्यांच्या निवासासाठी स्वतंत्र खोल्या असणार आहेत.

Yerwada Jail : महिला कैद्यांचे 'फिटे अंधाराचे जाळे', चौदा वर्षांनंतर झाली १० कोटी रूपयांची तरतूद

संग्रहित छायाचित्र

अंधार कोठडीतील महिलांना मिळणार खुल्या कारागृहाची सुविधा

येरवडा महिला खुले कारागृह हे देशातील पहिले खुले कारागृह आहे. मात्र १४ वर्षानंतर महिला खुल्या कारागृहाला मुहूर्त मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग ( पीडब्ल्यूडी) १० कोटी रूपये खर्च करून है खुले कारागृह बांधत आहे. त्यामुळे याठिकाणी उंच भिती, अंधार कोठड्या, कोंदट बराकी दिसणार नाहीत, महिला कैद्यांच्या निवासासाठी स्वतंत्र खोल्या असणार आहेत. त्या स्वतः स्वयंपाक करू शकतील, दिवसातील सहा ते आठ तास शेतात किवा इतर कामे मुक्त वातावरणात करता येणार आहे. यासह महिलांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता येऊन, त्यांना पॅरोल व फर्ला सुट्टी मिळेल. सर्वांत महत्त्वाचे खुल्या कारागृहातील एक दिवसाचे दोन दिवस धरतात. त्यामुळे महिला कैद्याची सुटका लवकर होईल.

गेली चौदा वर्ष महिला खुले कारागृह केवळ कागदावरच होते, महिला आठ तास शेतात किवा तत्सम कामे केल्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा उंच भितीआडच्या कोंदट वातावरणात होत असे. त्यामुळे खुल्या कारागृहाची खरी संकल्पना राबविली जात नसल्याची चौफेर टीका होत होती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १५ आगस्ट २०१० मध्ये देशातील पहिल्या खुल्या कारागृहाचे उ‌द्घाटन येरवड्यात केले होते, येरवडा महिला कारागृहाभोवती मोठी जागा आहे. या जागेत महिलांना निवासाची व्यवस्था करता येईल, समोरच्या शेतीत काम करता येईल. मुक्त वातावरणात काम केल्यामुळे खुल्या कारागृहाची संकल्पना साध्य होईल, असे धोरणकर्त्यांचे मत होते.

मात्र गेल्या चौदा वर्षांत महिला कैदी आहे त्या जागेत राहून फक्त कामासाठी शेतात येतात, काम झाले की पुन्हा अंधार कोठडीत येत. त्यामुळे खुले कारागृह केवळ कागदावरच दिसून येत होते. कैद्यांची 'सुधारणा व पुनर्वसन' हे कारागृह प्रशासनाचे बोधवाक्य आहे. मात्र, या बोधवाक्याप्रमाणे 'ना सुधारणा होते ना पुनर्वसन' सध्या कारागृहात कैदी संख्या दुप्पट व तिप्पट असल्यामुळे अनेक सुधारर्णचे प्रकल्प राबविणे कारागृह प्रशासाला अवघड जात आहे. महिला खुल्या कारागृहाची मोठी जागा आहे. या जागेत केवळ कैदी महिलांची निवास व इतर सोई सुविधासाठी बांधकाम करणे, कमी उंचीची संरक्षक भित बांधणे ही कामे करणे आवश्यक होते, इतर कारागृहातील बराकी बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कोटयावधी रूपये खर्च करते. मात्र, महिला खुल्या कारागृहासाठी ते पैसे खर्च करीत नव्हते, मात्र, आता तब्बल १० कोटी रूपये तरतूद झाली आहे. लवकरच निविदा प्रसिध्द होऊन कामाला मंजुरी मिळणार आहे.

महिलासाठी विविध उद्योग

कारागृहात महिला कैदी विविध उद्योगात गुंतले आहेत. यासह महिला बाहेर येऊन कारागृहाच्या शेजारी असलेल्या शेतात काम करतात. शेती मध्ये गहू, ज्वारीसह पाले भाज्या पिकवतात, शेतामधील उत्पन्न काही कोटीच्या घरात जाते. मात्र, महिलांना खुल्या कारागृहातील सोई सुविधा मिळत नव्हत्या. आता, लवकरच सुविधा मिळणार आहेत.

महिला कैद्यांसोबतच्या मुलांना शिक्षा !

महिला कैद्यांसोबत सहा वर्षाच्या आतील मुले नियमाप्रमाणे ठेवता येते, या सहा वर्षात त्यांना कारागृहाच्या बाहेरचे विश्व माहित होत नाही. त्यामुळे त्यांना गाय, बैल, घोडा असे प्राणी ओळखता येत नाही. त्यांना केवळ तुरुग रक्षक आणि कारागृहातील महिला कैदी हेच दिसतात. चारभितीच्या आतील त्यांचे विश्व खूपच संकुचीत असते. खुल्या कारागृहामुळे त्यांच्या विश्वाच्या कक्षा रुंदावणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने महिला खुल्या कारागृहातील दोन बराकी बांधण्यासाठी १० कोटींची तरतूद केली आहे. महिला कारागृहाबाहेर बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे शंभर महिला कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवता येईल."

- सुनिल ढमाळ, अधिक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest