Pune Police : पोलिसांवर आता कुत्र्यांच्या बाजूने लढण्याची वेळ, येरवडा पोलिसांच्या अंगावर पडली कामगिरी

'मिरर' मध्ये १३ ऑगस्ट २०२२ मध्ये ' Pigsty problem, Mental hospital staff are forced to live with it' या शिर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली होती. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील डुकरांचा वाढलेला उद्रेक थांबवा, अशी मागणी केली होती.

Pune Police : पोलिसांवर आता कुत्र्यांच्या बाजूने लढण्याची वेळ, येरवडा पोलिसांच्या अंगावर पडली कामगिरी

पोलिसांवर आता कुत्र्यांच्या बाजूने लढण्याची वेळ, येरवडा पोलिसांच्या अंगावर पडली कामगिरी

मानवाधिकार आयोगाकडून तंबी मिळाल्याने येरवडा पोलिसांच्या अंगावर पडली कामगिरी, डुकरे पाळणाऱ्यांवर कारवाई करून बंदोबस्त करण्याचे आदेश

कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे खरे तर पोलिसांचे भर काम. पण यामध्ये आणखी भर पडली आहे ते म्हणजे डुकरांचा बंदोबस्त करणे, कुत्र्यांचा सांभाळ करण्यासाठी लोकांना तयार करणे, येरवडा पोलिसांवर आता अशी कामे करण्याची वेळ आली आहे. पोलिसांना डुकरांच्या विरोधात आणि कुत्र्यांच्या बाजूने लढावे लागत आहे. कारण राज्य मानवी हक्क आयोगानेच तशी तंबी पोलिसांना दिली आहे. 'मिरर' मध्ये १३ ऑगस्ट २०२२ मध्ये ' Pigsty problem, Mental hospital staff are forced to live with it' या शिर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली होती. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील डुकरांचा वाढलेला उद्रेक थांबवा, अशी मागणी केली होती.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना मानवाधिकार आयोगाची नोटीस आली. यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात डुक्करांचा सुळसुळाट झाला आहे. याचा परिणाम मनोरूग्णांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे संबंधीत डुक्कर पाळणाऱ्यांवर कारवाई करून तत्काळ डुक्करांचा बंदोबस्त करा, असे म्हटले होते. वडगावशेरी ब्रम्हा सनसिटी येथील भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलीवर हल्ला करून जखमी केले होते. त्यामुळे वडगावशेरी येथील रहिवाशी भटक्या कुत्र्यांपासून रक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयात गेले.

उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला येथील सर्व भटकी कुत्री दुसरीकडे स्थलांतर करा, असे आदेश दिले. त्यामुळे महापालिकेने साधारणतः येथील ५० ते ६० कुत्री दुसरीकडे नेली. प्राणीप्रेमींनी याबाबत येरवडा पोलीस ठाणे, सहाय्यक आयुक्त येरवडा व पोलीस उपायुक्त, परिमंडळ -४ यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यांनी दखल न घेतल्याने प्राणीमित्र थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला ब्रम्हा सनसिटी येथील सर्व भटकी कुत्री पुन्हा मूळ जागी सोडण्याचे आदेश दिले. वरील दोन्ही घटनेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मानवाधिकार आयोगापुढे सुनावणीसाठी जावे लागले. त्यानंतर हे आपले काम नसले तरी आदेशाचे पालन करण्याची भुमिका असलेल्या पोलिसांनी येरवडा मनोरुग्णालय परिसरातील डुक्कर पाळणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवून तेथून हुसकावून लावले. संपूर्ण परिसर डुक्करमुक्त केला.

ब्रन्हा सनसिटी येथील कुत्र्यांचा प्रश्न येथील रहिवासी व प्राणीमित्र यांच्यात सामोपचाराने मार्ग काढण्याची जबाबदारी पोलिसांवर येऊन पडली. त्यांच्या बैठका घडवून आणाव्या लागल्या. त्यानंतर या वादावर तोडगा निघाला. मात्र, अजूनही कुत्र्यामुळे एखादी घटना घडली तर पहिला फोन येरवडा पोलीसांनाच केला जातो.

येरवडा परिसरातील डुक्कर पाळणाऱ्यांचा विषय तसा जटिल आहे. मनोरुग्णालयाच्या आवारातील अस्वच्छता, तेथील बायोगॅस प्लांटसाठी आणलेल्या हॉटेलमधील उरलेल्या खाद्यपदार्थांमुळे डुक्कराचा उपद्रव वाढला होता. राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशाने डुक्करांचा उपद्रव कायमस्वरूपी थांबवला आहे.

- शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ - ४

येरवडा पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर दोन विरूद्ध गोष्टींना सामोरे जावे लागले. यामध्ये डुक्करांच्या विरोधात आणि कुत्र्यांच्या बाजूने लढावे लागले. त्यामुळे येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील डुक्करांचा बंदोबस्त केला तर वडगावशेरी ब्रम्हा सनसिटी येथील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न समोपचाराने सोडवला आहे.

- बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस ठाणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest