इतिहासकालीन मंदिरे, किल्ले, गढी यांबरोबरच आणखी एक महत्त्वाची वास्तू म्हणजे वाडा! पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील खामगावमध्ये महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ असलेला परचुरे वाडा आहे. पेशवाईत या वाड्याला विशेष महत्त्व होते.