पीएमपी खड्डयात
पुणे पोस्ट ऑफिसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या शेजारी पाईपलाईनसाठी रस्ता खोदला आहे. त्यात बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पीएमपी बसचे चाक रुतले. त्यामुळे तब्बल अडीच तास रस्ता बंद करण्यात आला. परिणामी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून पुणे रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. पीएमपी बसचे अर्ध्याहून अधिक चाक चिखलात रुतल्याने दुसरी बस आणून ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नाला यश आले नाही. अखेर चिखलात रुतलेले चाक कर्मचाऱ्यांनी मोकळे केले. त्यानंतर दुसऱ्या बसच्या साहाय्याने रुतलेली बस बाहेर काढण्यात आली.