पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना जमावाची बेदम मारहाण

औंधमधील स्पायसर महाविद्यालय परिसरातील रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे दुकाने थाटणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी जमावाविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतरही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ९० टक्के अतिक्रमण काढण्याची कारवाई केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 8 Feb 2023
  • 03:22 pm
पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना जमावाची बेदम मारहाण

पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना जमावाची बेदम मारहाण

औंध येथील अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान झाली दगडफेक; चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

औंधमधील स्पायसर महाविद्यालय परिसरातील रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे दुकाने थाटणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी जमावाविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतरही अधिकारी व  कर्मचाऱ्यांनी ९० टक्के अतिक्रमण काढण्याची कारवाई केली.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहराच्या वेगवेगळ्या भागातील अतिक्रमणांवर मागील काही दिवसांपासून कारवाई केली जात आहे. औंध येथील स्पायसर महाविद्यालय परिसरातील रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे उभारलेल्या दुकानांवर कारवाई 

करण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक मंगळवारी सकाळी स्पायसर कॉलेज परिसरात दाखल झाले होते. त्यावेळी तेथील दुकानदारांनी कारवाईला विरोध करताना बेकायदेशीरपणे जमाव जमवून पथकावर दगडफेक केली. तसेच जेसीबी चालक व दोन अभियंत्यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतरही अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई सुरूच ठेवली. पथकाने ६० ते ६० हजार फुटांचे बांधकाम पाडून ९० टक्के कारवाई पूर्ण केली.  

या प्रकरणी महापालिकेच्या वतीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिक्रमण विभागाचे आयुक्त माधव जगताप यांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन, यापुढेही अतिक्रमण कारवाई अधिक कडक करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेच्या पथकावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.

औंध येथे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई मागे घेतली जाणार नाही, उलट अधिक तीव्रतेने राबवली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नमूद केले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story