निवडणूक यंत्रांची सरमिसळ

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांची ऑनलाईन अदलाबदल गुरुवारी करण्यात आली. निवडणूक यंत्रावर होणारे आक्षेप टाळण्यासाठी यंत्रांची ही सरमिसळ करण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 10 Feb 2023
  • 04:54 pm
निवडणूक यंत्रांची सरमिसळ

निवडणूक यंत्रांची सरमिसळ

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांची ऑनलाईन अदलाबदल गुरुवारी करण्यात आली. निवडणूक यंत्रावर होणारे आक्षेप टाळण्यासाठी यंत्रांची ही सरमिसळ करण्यात आली.

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक नीरज सोमवाल, एस. सत्यनारायण आणि निवडणुकीसाठी नेमलेले पोलीस निरीक्षक अश्विनीकुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत यंत्रबदलाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी सुभाष भागडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरवले यावेळी उपस्थित होते. निवडणुकीसाठी १ हजार ५८६ बॅलेट युनिट, १ हजार ५३९ कंट्रोल युनिट आणि १ हजार ५४२ व्हीव्हीपॅट यंत्रांची संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून सरमिसळ करण्यात आली. यापैकी ३३८ बॅलेट युनिट, ३३८ कंट्रोल युनिट आणि ३५१ व्हीव्हीपॅट कसबा पेठ मतदारसंघासाठी आणि ६३८ बॅलेट युनिट, ६३८ कंट्रोल युनिट ६६३ व्हीव्हीपॅट यंत्र चिंचवड मतदारसंघासाठी वितरित करण्यात येणार आहेत.  

 

कसब्यासाठी २७० मतदान केंद्र

कसबा विधानसभा मतदारसंघासाठी २७० आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी ५१० मतदान केंद्र असतील. या केंद्रांची यादी पुणे डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावर पाहायला मिळेल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story