कसब्यात पोस्टर; ‘आम्ही दाबणार नोटा’

पिंपरी-चिंचवडसह कसब्यात येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र, त्याआधी तिकीट वाटपावरून सुरू झालेले नाराजी नाट्य काही केल्या संपताना दिसत नसून, आता मतदानापूर्वी कसब्यात पोस्टरबाजी सुरू झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 12 Feb 2023
  • 10:01 am
कसब्यात पोस्टर; ‘आम्ही दाबणार नोटा’

कसब्यात पोस्टर; ‘आम्ही दाबणार नोटा’

तिकीटवाटपानंतरचे नाराजीनाट्य अद्यापही सुरूच; पोस्टरमुळे भाजपची धडधड वाढली

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

पिंपरी-चिंचवडसह कसब्यात येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र, त्याआधी तिकीट वाटपावरून सुरू झालेले नाराजी नाट्य काही केल्या संपताना दिसत नसून, आता मतदानापूर्वी कसब्यात पोस्टरबाजी सुरू झाली आहे.

कसब्यासह पुण्यातील काही परिसरात पोस्टर लावण्यात आले असून, यावर आमचेही ठरले, धडा कसा शिकवायचा.... कसबा हा गाडगीळांचा... कसबा हा बापटांचा... कसबा हा टिळकांचा... का काढला आमच्याकडून कसबा... आम्ही दाबणार NOTA... अशा स्वरूपाचा मजकूर लिहिलेले पोस्टर झळकण्यास सुरुवात झाली आहे. 

दरम्यान, हे पोस्टर नेमके कुणी लावले आहेत, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. परंतु, या पोस्टरबाजीनंतर आता कसब्यातील पोटनिवडणूक अधिक रंगतदार होणार हे नक्की झाले आहे.

पुण्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, येथे भाजपकडून हेमंत रासने तर, महाविकास आघाडीकडून 

रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी आवाहन केले होते.  मात्र महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीच्या जोरदार तयारीला उत्तर देण्यासाठी भाजपनेदेखील कंबर कसली असून, या पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह पुण्यात येणार आहेत. याशिवाय भाजपचे ४० स्टार प्रचारकदेखील प्रचारासाठी पुण्यात येणार आहेत. दुसरीकडे, भाजपच्या या तयारीनंतरदेखील कसब्यात निवडणुकीपूर्वी लावण्यात आलेल्या पोस्टरमुळे येथील नागरिकांमध्ये नाराजी असून, नेमका फटका कोणत्या पक्षाला बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पोस्टरमुळे काही अंशी भाजपमध्ये अस्वस्थता वाढली असल्याची चर्चाही शहरात सुरू झाली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story