गुटखा विक्रेत्यावर पोलिसांचा छापा, दोघांना अटक

पोलिसांनी कोंढवा परिसरात अवैध गुटखा विक्री आणि साठा करणाऱ्या दोघांना अटक केली. एनआयबीएम रस्त्यावरील पप्पू पान शॉप येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून पावणे सहा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 8 Feb 2023
  • 04:02 pm
गुटखा विक्रेत्यावर पोलिसांचा छापा, दोघांना अटक

गुटखा विक्रेत्यावर पोलिसांचा छापा, दोघांना अटक

#कोंढवा

पोलिसांनी कोंढवा परिसरात अवैध गुटखा विक्री आणि साठा करणाऱ्या दोघांना अटक केली. एनआयबीएम रस्त्यावरील पप्पू पान शॉप येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून पावणे सहा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीतलाल श्रीरामनंदन यादव (वय ३९, रा. भोईटे चाळ, कोंढवा खुर्द, मूळ रा. उत्तर प्रदेश), अभिजित शिवलिंग कटके (वय २५, रा. येवलेवाडी, कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा विक्री सुरू आहे. गुटखा विक्रीबाबत कुठल्याच नियमावलीचे पालन होत नाही. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून गुटखा विक्रेत्यांवर छापे टाकण्यात येत आहेत. 

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कोंढवा खुर्द येथील लोणकरनगर, एनआयबीएम रस्ता परिसरात तंबाखूजन्य गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस नाईक जोतिबा पवार आणि विशाल मेमाणे यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी पप्पू पान शॉप येथे छापा टाकून गुटखा विक्री करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच लाख ७३ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपींनी गुड्डू खान (रा. कोंढवा बुद्रुक) याच्याकडून गुटखा विकत घेत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून कोंढवा पोलीस संशयित गुड्डू खान याचा शोध घेत आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story