'दिल्लीत गोंधळ, चिंचवडमध्ये मुजरा'

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची सगळीकडे चर्चा आहे. मंगळवारी राजू काळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र राजू काळे यांनी १० हजार रुपयांची नाणी अर्ज भरण्यासाठी आणल्याने सर्वांना 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या चित्रपटातील अभिनेते मकरंद अनासपुरे यांची आठवण झाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 8 Feb 2023
  • 03:31 pm
'दिल्लीत गोंधळ, चिंचवडमध्ये  मुजरा'

'दिल्लीत गोंधळ, चिंचवडमध्ये मुजरा'

उमेदवाराने आणली ५० हजारांची नाणी; रक्कम मोजण्यासाठी लागला तब्बल अर्धा तास

#चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची सगळीकडे चर्चा आहे. मंगळवारी राजू काळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र राजू काळे यांनी १० हजार रुपयांची नाणी अर्ज भरण्यासाठी आणल्याने सर्वांना 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या चित्रपटातील अभिनेते मकरंद अनासपुरे यांची आठवण झाली. काळे यांच्या १० हजार रुपयांच्या नाण्यांमुळे अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली.

पुणे जिल्ह्यातील चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. राहुल कलाटे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. हे सर्व सुरू असताना रयत विद्यार्थी परिषदेचे राजू काळे चर्चेत आले आहेत. चिंचवडमध्ये रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे राजू काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी त्यांनी डिपॉझिट भरण्यासाठी १० हजारांची नाणी आणली होती. यामध्ये १ रुपया, २ रुपये, ५ रुपये आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. याच कारणामुळे निवडणूक कर्मचारी, अधिकाऱ्यांना अनामत रक्कम मोजताना चांगलीच कसरत करावी लागली. यावेळी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया देखील पाहण्यासारखी होती.

चिंचवड मतदारसंघात भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात निवडणूक रंगण्याची शक्यता आहे. भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत या संदर्भातील चित्र स्पष्ट होईल. चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध मविआ असं चित्र पाहायला मिळेल. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनं शिवसेना ठाकरे गटाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story