धावत्या बसमधून मारली उडी अडवली गाडी, वाचवले ३४ जीव
सीविक मिरर ब्यूरो
feedback@civicmirror.in
बारामतीच्या मोरगाव मधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन घेलेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. बसचे ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात येताच बस चालकाने रस्त्यावरच्या नागरिकांना सावध करत, चालत्या बसमधून उडी मारून चाकाखाली दगडं टाकून बस थांबवली. चालकाने दाखवलेल्या ह्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला आहे. बस वरंधघाट मार्गे रायगड किल्ल्यावर विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात असताना पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात ही घटना घडली. बसमध्ये एकूण ३४ विद्यार्थी होते.
मोरगावमधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. बसचे ब्रेक निकामी झाल्याचं लक्षात येताच चालकाने रस्त्यावरच्या नागरिकांना सावध करत चालत्या बस मधून उडी मारून चाकाखाली दगडं टाकून बस थांबवली. चालकाने दाखवलेल्या ह्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सहलीसाठी मोरगावमधील खासगी क्लासच्या ३४ विद्यार्थ्यांना घेऊन मांढरदेवीचे दर्शन करून बस क्रमांक एमएच १२ एचसी ९११९ भोर वरंधघाट मार्गे रायगडला जात असताना भोर चौपाटीजवळ बसचा ब्रेक एअर पाईप फुटल्याने बसचे ब्रेक निकामी झाले. बसचे ब्रेक निकामी झाल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान दाखवले. चालत्या बसमधून उडी मारून बसच्या चाकाखाली दगड टाकून बस थांबवली.
दरम्यान, बसमधले सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच, पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून चालक आणि विद्यार्थ्यांना धीर देत रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.