आधी लोकभावना मग कला

कलाकृतीचे स्वातंत्र्य द्यायला हवे, मात्र कलाकृतीच्या नावाखाली लोकभावना दुखावता कामा नये, असे सांगत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अद्याप मला पठाण चित्रपट पाहायला वेळ मिळाला नसल्याचे सांगितले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 6 Feb 2023
  • 05:09 pm
आधी लोकभावना मग कला

आधी लोकभावना मग कला

'पठाण' बाबत मुख्यमंत्री योगींचे सूचक वक्तव्य

#गोरखपूर

कलाकृतीचे स्वातंत्र्य द्यायला हवे, मात्र कलाकृतीच्या नावाखाली लोकभावना दुखावता कामा नये, असे सांगत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अद्याप मला पठाण चित्रपट पाहायला वेळ मिळाला नसल्याचे सांगितले आहे.  

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला होता. रविवारी पत्रकारांनी या चित्रपटाबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री योगी यांनी यावर सविस्तर भाष्य केले. योगी म्हणाले की, मला अजून तरी पठाण हा चित्रपट पाहता आलेला नाही आणि मुख्य म्हणजे माझ्याकडे चित्रपट पाहण्याकरिता तितका वेळही नाही. मी कलाकारांचा आदर करतो. मी लेखकांचा आदर करतो. ज्याच्याकडे विशेष कौशल्य आहे त्याला आम्ही पूर्ण आदर देतो, पण आमच्याकडे चित्रपट पाहण्याइतका वेळ नाही. आम्ही कलाकार, लेखक आणि विशेष टॅलेंट असलेल्या लोकांचा कायमच शासकीय स्तरावर आदर करत असल्याचे त्यांनी सांगितले.  पण जेव्हा जेव्हा आपण चित्रपट निर्मिती करतो, त्यावेळी आपण लोकांच्या भावनांचा आदर करायला हवा. या चित्रपटाच्या सादरीकरणाबरोबरच लोकांच्या भावनाही महत्त्वाच्या आहेत. त्याबद्दल आदर असणं गरजेचे आहे. लोकांच्या भावना दुखावल्या जातील, अशा कोणत्याही गोष्टी करण्याची परवानगी कोणालाही देऊ नये”, असेही ते म्हणाले.

त्यांनी चित्रपट बॉयकॉट करण्याबद्दलही आवर्जून प्रतिक्रिया दिली. पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरून तो चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. यानंतर अनेक ठिकाणी शाहरुख खानचे पुतळे जाळण्यात आले होते. तसेच चित्रपटगृहांचीही तोडफोड करण्यात आली होती. यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही सीनला कात्री लावत तो चित्रपटगृहात प्रदर्शित केला. चित्रपटाच्या बॉयकॉट ट्रेंडबद्दल विचारल्यावर त्यांनी, उत्तर प्रदेशात या चित्रपटाला कुठेही विरोध झाला नाही. एका ठिकाणी याबद्दल वाद झाला होता. पण तिथे एक प्रेक्षक या चित्रपटाचा रिल व्हीडीओ बनवत होता. पण चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले आणि हा वाद निर्माण झाला. या व्यतिरिक्त इतर कोणताही वाद झाला नसल्याचे सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest