ड्रॅगनच्या कानात अस्त्रांचा गजर

बंगळुरूमध्ये लवकरच आशियातील सर्वात मोठे हवाई समार्थ्याचे प्रदर्शन होणार असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारत आपल्या हवाई सामर्थ्याने चीनच्या कानात गजर करणार असल्याचे संकेत आहेत. एअरो इंडियाच्या या प्रदर्शनानिमित्त भारताकडून अमेरिकन बनावटीचे संहारक लढाऊ विमान एफ-२१, एस-९२ हे बहुउद्देशीय लढाऊ हेलिकॉप्टर, एमएच-६० आर रोमियो मल्टी-मिशन हेलिकॉप्टर आणि अशा अनेक संहारक अस्त्रांचे दिमाखदार प्रदर्शन केले जाणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 6 Feb 2023
  • 04:37 pm
ड्रॅगनच्या कानात अस्त्रांचा गजर

ड्रॅगनच्या कानात अस्त्रांचा गजर

‘एयरो-इंडिया’ च्या माध्यमातून भारत करणार हवाई सामर्थ्याचे प्रदर्शन

#दिल्ली

बंगळुरूमध्ये लवकरच आशियातील सर्वात मोठे हवाई समार्थ्याचे प्रदर्शन होणार असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारत आपल्या हवाई सामर्थ्याने चीनच्या कानात गजर करणार असल्याचे संकेत आहेत. एअरो इंडियाच्या या प्रदर्शनानिमित्त भारताकडून अमेरिकन बनावटीचे संहारक लढाऊ विमान एफ-२१, एस-९२ हे बहुउद्देशीय लढाऊ हेलिकॉप्टर, एमएच-६० आर रोमियो मल्टी-मिशन हेलिकॉप्टर आणि अशा अनेक संहारक अस्त्रांचे दिमाखदार प्रदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे या शक्तिप्रदर्शनाने चीनचे डोळे दिपून जातील, असा भारताचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.    

येत्या १३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान 'एयरो-इंडिया' प्रदर्शन होणार आहे. भारतीय हवाईदलाकडून या प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू आहे. विविध क्षमतेची आणि विविध उद्दिष्ट पूर्ण करणारी लढाऊ विमाने, विमानवाहक जेट, बॉम्बर, अटॅक हेलिकॉप्टर, मल्टीरोल हेलिकॉप्टर अशी सगळी आयुधे आकाशात आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करणार आहेत. अमेरिकेच्या हवाई क्षमताही या प्रदर्शनानिमित्त जोखता येणार आहेत. या प्रदर्शनात अमेरिकेकडूनही हवाई क्षेत्रातील नव्या संशोधित अस्त्रांच्या करामती दाखवल्या जाणार आहेत. जगभरातील बहुतांश देशाच्या हवाई आयुधांच्या कसरती प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

या प्रदर्शनात भारताचे सी-१३० सुपर हर्क्युलस विमानही सहभाग घेणार आहे. नुकतेच भारताने अमेरिकेकडून खरेदी केलेले हे विमान युद्धात निर्णायक भूमिका बजावू शकते. जगभरातील हवाई शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. त्या निमित्त त्यांना जगासमोर आपली अत्याधुनिक उत्पादने दाखवता येणार आहेत, तसेच संभाव्य ग्राहक देशांसमोर आपल्या उत्पादनांची जाहिरातही करता येणार आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest