Cyber cell : विनयभंगाचे ऑनलाईन गुन्हे सायबर सेलकडे
इन्स्टंट लोन, तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून महिलांचा विनयभंग करण्यात आलेली दहा प्रकरणे तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे देण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच ७ गुन्हे आयटी पार्क, हिंजवडी परिसरातील असून, चिंचवडमधील २ तर निगडी भागातील एक गुन्हा आहे.