Hinjewadi : हिंजवडीत अभियंता तरुणीचा सहकाऱ्याकडूनच विनयभंग

व्यवसायवाढीसाठी स्त्रीत्वाचा आणि सौंदर्याचा वापर करण्याचा आग्रह धरत एका आयटी अभियंत्या तरुणीचा तिच्या सहकारी अभियंत्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील फेज-१ मधील एका बड्या कंपनीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Thu, 18 May 2023
  • 11:53 am
हिंजवडीत अभियंता तरुणीचा सहकाऱ्याकडूनच विनयभंग

हिंजवडीत अभियंता तरुणीचा सहकाऱ्याकडूनच विनयभंग

व्यवसायवाढीसाठी स्त्रीत्वाचा आणि सौंदर्याचा वापर करण्याचा धरला आग्रह

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

व्यवसायवाढीसाठी स्त्रीत्वाचा आणि सौंदर्याचा वापर करण्याचा आग्रह धरत एका आयटी अभियंत्या तरुणीचा तिच्या सहकारी अभियंत्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील फेज-१ मधील एका बड्या कंपनीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अन्नीरवान्न शिवब्रत मुखर्जी असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. तर या प्रकरणी ३५ वर्षीय अभियंता महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मे २०२२ पासून २१ एप्रिल २०२३ या कालावधीत हा सर्व प्रकार घडला असून, संबंधित महिलेने याबाबत आता पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली आहे. संबंधित महिला आणि आरोपी एकाच कंपनीत काम करतात.

कार्यालयातील एका सहकाऱ्याने व्यवसायवाढीसाठी स्त्रीत्वाचा आणि सौंदर्याचा वापर करण्याचा आग्रह धरला आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे  महिला अभियंत्याने फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे हा प्रकार तिने संबंधित कंपनीतील व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिला.

फिर्यादी अभियंता महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर मुखर्जी याला चौकशीनंतर समज देण्यात आली होती. परंतु, त्यानंतरही त्याने कंपनीच्या आवारात पीडित अभियंता महिलेला त्रास देणे सुरूच ठेवले. फिर्यादी जिथे जाईल तिथे मुखर्जी पाठलाग करत येत असल्याने पीडित महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणाबाबत तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. प्रत्येक कंपनीत यासाठी विशाखा समिती स्थापन करून, महिलांच्या तक्रारींची दखल घेणे, प्रथमदर्शनी मदत करणे क्रमप्राप्त असून, सर्व कंपन्यांमध्ये या समितीचे काम व्यवस्थित सुरू आहे का याची पाहणी पोलिसांकडून केली जात आहे. या घटनेनंतर हिंजवडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीत जाऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest