Pune traffic jam : रविवारी अनुभवला ‘शाही’ जॅम

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यामुळे पुण्यातील अनेक भागात तसेच पिंपरी -चिंचवडमध्ये कमालीची वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शनिवारी (५ ऑगस्ट) सायंकाळी शाह पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या खासगी कामासाठी ते सॅलिसबरी पार्क परिसरात गेले होते. तसेच शाह यांचा मुक्काम असलेल्या हॉटेल परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Mon, 7 Aug 2023
  • 11:05 am
रविवारी अनुभवला ‘शाही’ जॅम

रविवारी अनुभवला ‘शाही’ जॅम

रंगीत तालीमनंतरही पुणेकरांसह पिंपरी-चिंचवडकरांना वाहतूक कोंडीचा जाच

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यामुळे पुण्यातील अनेक भागात तसेच पिंपरी -चिंचवडमध्ये कमालीची वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शनिवारी (५ ऑगस्ट) सायंकाळी शाह पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या खासगी कामासाठी ते सॅलिसबरी पार्क परिसरात गेले होते. तसेच शाह यांचा मुक्काम असलेल्या हॉटेल परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

शाह यांच्या दौऱ्याची रंगीत तालीम पोलिसांकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी घेण्यात आली होती. यासाठी वाहतूक काही भागात थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. शाह यांचा दौरा नियोजित असल्याने याबाबत पोलिसांनी पूर्व कल्पना दिली होती. परंतु, रंगीत तालीम घेण्यात आल्याने शनिवारी घरी परतणाऱ्या पुणेकरांना तसेच दुपारी पिंपरी-चिंचवडकरांना मनस्ताप सहन करावा लागला. रविवारी चिंचवड गावातील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री उपस्थित असल्याने संपूर्ण चिंचवड गाव परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर शाह यांच्यासह मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा ज्या भागातून गेला तेथील दुकाने बंद ठेवण्यात आल्याने रविवारी नेहमी गजबजलेल्या परिसरातही शुकशुकाट होता.

तसेच शाह यांच्यासह मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा येण्यापूर्वी आणि जाण्यापूर्वी काही मिनिटे वाहने थांबवून ठेवल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पाहायला मिळाले. परंतु, शाह आणि अन्य मंत्री विमानतळावर जाताना ठराविक अंतरावरील वाहतूक सुरळीत केली जात होती. पोलीस सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहा उपायुक्त, १० साहाय्यक आयुक्त, ४२ वरिष्ठ निरीक्षक, १३७ साहाय्यक पोलीस / फौजदार, १३१९ पोलीस कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक कंपनी, बॉम्ब शोधक-नाशक सहा पथके पिंपरी-चिंचवड परिसरात तैनात करण्यात आली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story