सावत्र बापाने केली तीन वर्षीय चिमुकलीची हत्या

रडत असल्याने सावत्र बापाने तीन वर्षीय चिमुकलीच्या मुलीच्या पोटात गुद्दे मारत तिचे डोके भिंतीवर आपटून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार देहूरोड नजिक चिंचोली येथे सोमवारी (१२ जून) रात्री घडला आहे. या प्रकरणी महादेव नारायण गायकवाडला (वय २२, रा. चिंचोली) देहू रोड पोलिसांनी अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Thu, 15 Jun 2023
  • 12:45 am
सावत्र बापाने केली तीन वर्षीय चिमुकलीची हत्या

सावत्र बापाने केली तीन वर्षीय चिमुकलीची हत्या

सतत रडते म्हणून डोके भिंतीवर आपटले

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

रडत असल्याने सावत्र बापाने तीन वर्षीय चिमुकलीच्या मुलीच्या पोटात गुद्दे मारत तिचे डोके भिंतीवर आपटून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार देहूरोड नजिक चिंचोली येथे सोमवारी (१२ जून) रात्री घडला आहे. या प्रकरणी महादेव नारायण गायकवाडला (वय २२, रा. चिंचोली) देहू रोड पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार किशोर बबनराव दुतोंडे यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली आहे. तर गुड्डी या चिमुरडीचा खून झाला आहे.

गुड्डी ही सतत रडत असायची. सातत्याने ती का रडते म्हणून महादेव त्याच्या पत्नीशी भांडण करीत असे. मुलीच्या रडण्यावरून होणाऱ्या वादातून मुलीच्या पोटात बुक्क्यांनी मारत तिला भिंतीवर आपटले. यात तिचा मृत्यू झाला. मात्र, तिचा जीव गेल्याचे लक्षात आले नाही. आरोपीने आणि मुलीच्या आईने मुलीला रुग्णालयात नेले. मुलगी आजारी असल्याचे त्यांनी डाॅक्टरांना सांगितले. मात्र, मुलीचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले. 

मुलीचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पोलिसांना कळवले. शवविच्छेदनानंतर मुलीच्या शरीरांतर्गत दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सावत्र वडिलांना अटक केली. महादेव गायकवाड हा मूळचा छत्रपती संभाजी नगर येथील आहे. गेल्या काही वर्षांपासून तो त्याच्या वडिलांसह चिंचोली येथे राहण्यास आहे. महादेव आणि त्याचे वडील हे दोघेही पुणे स्टेशन येथे साफसफाईचे काम करतात. दोन महिन्यांपूर्वी तीन वर्षीय मुलगी आणि तिची आई पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आले होते. त्यावेळी महादेवच्या वडिलांनी दोघींना चिंचोली येथे घरी आणले. महादेवसोबत या मुलीच्या आईचे लग्न लावण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून ती महिला आणि महादेव हे दोघेही पती-पत्नीसारखे राहत होते. गुड्डी ही कोणाची मुलगी आहे. तुम्ही मूळचे कुठले आहात. पुणे रेल्वे स्थानकात कसे आलात. तुमचे लग्न कोणाबरोबर आणि कधी झाले याबाबत पोलिसांकडून मुलीच्या आईकडे चौकशी केली जात आहे. मात्र, गुड्डी ची आई वेगवेगळी माहिती सांगत असल्याने पोलीस तिची देखील चौकशी करीत आहेत. त्याच बरोबर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुड्डी आणि तिच्या आईबाबत काही माहिती उपलब्ध आहे का याची पडताळणी सध्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरू केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story