Corona Center contract : कोरोना सेंटरच्या कंत्राटासाठी बनावट करार, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल
पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी बनावट भागीदारी करार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुजित पाटकर यांच्यासह लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजित पाटकर हे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे.