कोरोना सेंटरच्या कंत्राटासाठी बनावट करार, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल
पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी बनावट भागीदारी करार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुजित पाटकर यांच्यासह लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजित पाटकर हे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यातील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट मिळवण्यासााठी सुजित पाटकर यांनी बनावट भागीदारी केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्याने यांनी सुचित पाटकरांनी बनावट करार केल्याचाही आरोप सोमय्यानी केला होता.
अखेर लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे सुजित पाटकर यांच्यासह डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, संजय मदनराज शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुचित पाटकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.