Blue Bells School : कोंढव्यातील शाळेवर कोणतीही कारवाई नाही, पुणे पोलीसांची माहिती
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्याच्या कोंढव्यातील ब्ल्यू बेल्स शाळेच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही, असे स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी दिले आहे.
काही दिवासांपुर्वीच पुण्याच्या कोंढव्यातील ब्ल्यू बेल्स शाळेवर कारवाई केल्याचे समोर आले होते. याबाबत स्पष्टीकरण देताना पुणे पोलिसांनी सांगितले की, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोंढव्यातील ब्ल्यू बेल्स शाळेच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. त्या शाळेच्या इमारतीतील चौथ्या आणि पाचवे मजले बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ताब्यात असल्याने दोन मजले एनआयएकडून सीलबंद करण्यात आले आहेत.
कोंढव्यातील के. झेड. इमारत ब्ल्यू बेल्स शाळेची इमारत म्हणून ओळखली जाते. पोलीस किंवा एनआयकडून शाळेची चौकशी करण्यात आली नाही, तसेच शाळेच्या खोल्या किंवा कार्यालयदेखील सील करण्यात आले नाही, असेही पुणे पोलिसांनी सांगितले आहे.