"अजित पवार भावी मुख्यमंत्री"
पुण्यात राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नावाने बॅनरबाजी करण्यात आली आहे. "अजित पवार भावी मुख्यमंत्री" अशा आशयाचे बॅनर पुण्यातील कोथरूड परिसरात लावण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या नावाची राज्यभर चर्चा होत आहे. अजित पवार ३० ते ४० आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्याही चर्चा आहेत. अशातच अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरीत एक न्युज चॅनलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे वक्तव्य केले होते.
अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर पुण्यातील कोथरूड भागात भावी मुख्यमंत्री अजित पवार, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहेत. दरम्यान, या अगोदर देखील राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या नावाने पुण्यात बॅनर लावण्यात आले होते.