पुणे विद्यापीठात अभाविपचा जोरदार राडा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांच्या प्रलंबित ठेवणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने आज ट्रॅफिक जाम आंदोलन केले. यावेळी मुख्य सभेत जाऊन आंदोलन करत तोडफोड केली. तसेच निवेदन विद्यापीठ कुलगुरूच्या अंगावरती भिरकवली आणि बैठकही उधळून लावली आहे.
विद्यापीठातील मुख्य इमारतीत अश्लील रॅप साँग शूट केल्यामुळे या प्रकाराची चांगलीच चर्चा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक पवित्रा घेतला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये परवानगी नसताना अश्लील भाषेत केलेले रॅप साँगचे शूटिंग झाली कशी? याची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांचे न झालेले पदवी ग्रहण सोहळा व डिग्री सर्टिफिकेट न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे परदेशातील प्रवेश प्रलंबित आहे ते लवकरात लवकर देण्यात यावे, परीक्षांचे प्रलंबित निकाल आणि लागलेल्या निकालांमध्ये चुका झालेल्या आहेत, त्या तात्काळ दुरूस्त करण्यात याव्यात, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत.