Traffic changes : बंडगार्डन परिसरातील वाहतूकीत बदल

पुणे मेट्रो रिच - ३ या मार्गिकेवर बंडगार्डन येथे मेट्रो स्टेशनच्या स्टिल गर्डर ईरेक्शनचे काम सुरु असल्याने येथील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूवरुन तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूक २१ एप्रिल ते ११ मे २०२३ रोजीपर्यंत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sun, 23 Apr 2023
  • 12:07 pm
बंडगार्डन परिसरातील वाहतूकीत बदल

बंडगार्डन परिसरातील वाहतूकीत बदल

मेट्रोच्या कामामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक ठेवणार बंद

पुणे मेट्रो रिच - ३ या मार्गिकेवर बंडगार्डन येथे मेट्रो स्टेशनच्या स्टिल गर्डर ईरेक्शनचे काम सुरु असल्याने येथील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूवरुन तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूक २१ एप्रिल ते ११ मे २०२३ रोजीपर्यंत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग

> पुणे स्टेशनकडून येऊन येरवडाकडे जाणारी वाहने मोबाज चौक, मंगलदास रोडने, ब्ल्यु डायमंड चौक, कोरेगांव पार्क जंक्शन, पर्णकुटी चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

> पुणे स्टेशनकडून येऊन बोटक्लबडे जाणारी वाहने मोबाज चौक, डावीकडे वळून ढोले-पाटील रोडने इच्छितस्थळी जातील.

> बोटक्लब रोडने येऊन येरवडाकडे जाणारी वाहने श्रीमान चौकातून सरळ अमृतलाल मेहता रोडने कोरेगांव पार्क चौकातून इच्छितस्थळी जातील.

> येरवडाकडून येऊन पुणे स्टेशनकडे जाणारी वाहने पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, कोरेगांव पार्क जंक्शन, ब्ल्यु डायमंड चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जातील.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story