चिमुकली सुखरुप पोहोचली पालकांच्या ताब्यात
पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर रडत बसलेली ४ वर्षाची चिमुकली पालकांकडे सुखरूप पोहोचेली आहे. बंडगार्डन पोलिसांनी या चिमुकलीला तिच्या पालकांकडे पोहोचवले. श्रावणी गंगाधर तोरणी असे या चिमुकलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन पोलिस पेट्रोलिंग करत असताना रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ०६ वर ४ वर्षाची लहान मुलगी रडत बसलेली दिसलेली दिसून आली. यावेळी पोलिसांनी तिला नाव विचारले. मात्र, तिला मराठी आणि हिंदी भाषा येत नव्हती. यावेळी पोलिसांनी एका कन्नड भाषीकाला बोलावून घेतले. त्यानंतर चिमुकलीने कन्नड भाषेत आपले नाव सांगितले.
चिमुकलीचे नाव समजल्यानंतर तिच्या पालकांचा शोध घेतला. त्यानंतर ताडीवाला रोड भागात राहत असलेल्या महिला दानम्मा गंगाधर तोरणी यांची मुलगी असल्याचे समजले. या महिलेला बोलावून पोलिसांनी चिमुकली त्याच्या ताब्यात दिली.