प्रेयसीच्या सव्वा वर्षाच्या बाळाला उकळत्या पाण्यात फेकले
पुणे जिल्ह्यातील खेड शेलपिंपळगाव येथे प्रियकराने प्रेयसीच्या सव्वा वर्षीय चिमुकल्या बाळाला उकळत्या पाण्यात बुडवून जीवे मारल्याची हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी प्रियकर विक्रम शरद कोळेकर (रा. कोयळी ता. खेड जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम आणि तक्रारदार महिलेचे प्रेमसंबंध होते. ६ एप्रिलला प्रियकर आरोपी विक्रम हा प्रेयसीच्या घरी गेला. यावेळी प्रेयसीची मावस बहीण फोनवर बोलत बाहेर उभी होती. याचाच फायदा घेत प्रियकराने बाथरुममधील बादलीत असलेल्या उकळत्या पाण्यात अवघ्या सव्वा वर्षीय चिमुकल्याला बुडवले.
यावेळी बाळाचा रडण्याचा आवाज आल्यामुळे प्रेयसीची बहिण घरात आली. त्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला. बाळाला उकळत्या पाण्यात बुडवल्याने बाळ गंभीर भाजले होते. त्यानंतर चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रेयसीने चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपी अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.