अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ५५६८ वाहनांची खरेदी
पुणेकरांनी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने, चांदीबरोबरच वाहन खरेदीलाही मोठी पसंती दिल्याचे समोर आले आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पुणेकरांनी जवळपास ५५६८ वाहने खरेदी केले आहेत.
शनिवारी अक्षय तृतीयाचा सन राज्यभरासह पुण्यातही मोठ्या उत्साहात पार पडला. अक्षय तृतीयाला नागरिक सोने, चांदी खऱेदी करताना पाहायला मिळातात. मात्र, त्याचबरोबर वाहन खरेदीकडेही नागरिकांचा मोठा कल असतो. पुण्यातही अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ५५६८ वाहन खरेदीची नोंद झाली आहे.
यामध्ये ४१६ इलेक्टीकल वाहनांची खरेदी झाली तर ५१५२ इतर वाहनांची नोंद झाली. ही आकडेवारी १५ एप्रिल ते २२ एप्रिल २०२३ दरम्यानची आहे. गेल्या वर्षी याच कालवधीत ४६१ इलेक्ट्रीकल वाहनांची खरेदी झाली होती. तर ५१९८ इतर वाहनांची खरेदी झाली होती. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुणेकरांनी केलेली वाहन खरेदी काहीशी कमी असल्याचे दिसून आले आहे.