बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

वाकड येथील बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी जमीन मालकासह त्याच्या कुटुंबीयाला धमकावून मारहाण करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 3 May 2023
  • 11:31 am
बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपण्याचा प्रयत्न

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपण्याचा प्रयत्न

आरोपींकडून जमीन मालकाला बेदम मारहाण

वाकड येथील बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी जमीन मालकासह त्याच्या कुटुंबीयाला धमकावून मारहाण करण्यात आली आहे.

या प्रकरणी सुरेश चंदुलाल होळकर (वय ५२) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी सचिन नागटीकल, पोपट पांडू राजीवाडे, त्याची पत्नी, सून व अन्य साथीदाराविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वाकड येथील होळकर यांच्या फ्लॅटमध्ये बळजबरीने घुसून कोयता, लोखंडी रॉड आणि पाईपने तोडफोड केली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या होळकर यांचे कामगार सचिन कारंडे यांना मारहाण केली.

आरोपींनी बनावट कागदपत्रे सादर तयार केली होती. यावर ७ जुलै २०२१ रोजी येथील जमीन खरेदी केल्याचा दावा केला. यासाठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बनावट विक्री केल्याचे दाखवून होळकर यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींनी इतर मालमत्तेच्या कागदपत्रावर देखील होळकर यांची स्वाक्षरी मालमत्ता बेकायदेशीरपणे हस्तगत करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात एका जणाविरोधात कलम ३४२, ३२४, ३२३, ५०४ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केली नाही. हिंजवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story