सायबर चोरट्यांचा महिलेला २ लाखाला गंडा
पुण्यात फेसबुकवर एका थाळीवर एक थाळी फ्री ऑफर असल्याचे भासवून सायबर चोरट्याने एका महिलेला तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात खडकी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सायबर चोरटे केरळचे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेतील एका ३८ वर्षीय महिलाला फेसबुकवर सुकांता थाळीची एका थाळीवर एक थाळी फ्री, अशी ऑफर असल्याची जाहिरात आली होती. या जाहिरातीवर दिलेल्या नंबर महिलेच्या पतीने फोन केला.
त्यानंतर सायबर चोरट्यांनी बँक खात्याचे तपशील मागितले. महिलेच्या पतीने बँक खात्याची माहिती देताचा चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ९९ हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रकाश कुमार आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी खडकी पोलिस अधिक तपास करत आहेत.