सिंहगड एक्स्प्रेसमध्ये सीटसाठी मारहाण
पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये पुन्हा एकदा मारहाणीची घटना घडली आहे. एका ३७ वर्षीय व्यक्तीवर सीटवर बसण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे येथील संदिप गोंडगावे (वय ३७) हे सोमवारी लोणावळा रेल्वे स्थानकावर मुंबईला जाण्यासाठी सिंहगड एक्स्प्रेस रेल्वेत चढले होते. यावेळी डब्यात रिकाम्या असलेल्या सीटवर संदिप गोंडवावे बसण्यासाठी गेले. मात्र, डब्यात रिकामी सीट असताना ५ ते ७ जणांचा गट असलेल्या प्रवाशांनी त्यांना मनाई केली.
यावरून झालेल्या वादादरम्यान संदिप आणि त्यांच्या सहकाऱ्याला मारहाण करण्यात आली. याप्रकऱणी संदिप यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रेल्वेमध्ये प्रवाशांची सातत्याने गर्दी वाढत असल्याने रेल्वेचे डब्बे वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, रेल्वे प्रशासन अद्यापही यावर काही निर्णय घेताना दिसत नाही.