फुकट पेट्रोल भरलं, पैसे मागताच कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबळी फाटा येथे असलेल्या शेल पेट्रोल पंपावर दुचाकीवरून आलेल्या तीन जणांच्या टोळक्यांनी पेट्रोल भरले. मात्र, पेट्रोलचे पैसे मागायला गेल्यानंतर पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावेळी कर्मचाऱ्याकडे जमा असलेले १ हजार ५०० रुपये देखील हिसकावून नेले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 28 Apr 2023
  • 06:04 pm
फुकट पेट्रोल भरलं, पैसे मागताच कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

फुकट पेट्रोल भरलं, पैसे मागताच कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या खिशातील रोख रक्कमही पळवली

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबळी फाटा येथे असलेल्या शेल पेट्रोल पंपावर दुचाकीवरून आलेल्या तीन जणांच्या टोळक्यांनी पेट्रोल भरले. मात्र, पेट्रोलचे पैसे मागायला गेल्यानंतर पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावेळी कर्मचाऱ्याकडे जमा असलेले १ हजार ५०० रुपये देखील हिसकावून नेले.

या प्रकरणी गौरव धर्मराज भुमकर, शुभम अनंता लोखंडे आणि कृष्णा या तिघांविरोधात म्हाळुंग एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या प्रकरणी कर्मचारी आशिष राधाकिशन सिंग राजपुत यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिनही आरोपी त्याच्या दुचाकीवरून चिंबळी फाटा येथील शेल पेट्रोल पंपावर आल्यानंतर २२० रुपयांचे पेट्रोल भरले. मात्र, त्यानंतर तिघेही पैसे न देता पेट्रोल पंपाच्या कॅन्टीन जवळ गेले. यावेळी आशिष यांनी आरोपींच्या जवळ जावुन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

मात्र, पैसै न देता टोळक्यांनी आरडाओरडा करून दहशत माजवण्यास सुरवात केली. आम्ही कोण आहे तुला माहीत आहे का? असे म्हणुन एका आरोपीने  आशिष यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर मारहाण करून कर्मचाऱ्याच्या खिशातील ग्राहकांकडून गोळा झालेली १ हजार ५०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने खिशातुन काढुन घेतली.

त्याचवेळी दुसऱ्या आरोपीने बिअरची बाटली फिर्यादीच्या दिशेने फेकुन मारली. सुदैवाने फिर्यादीने ती चुकविल्याने कॅन्टीनचे काचेवर लागली. मात्र, त्यानंतर आरोपींनी आशिष यांनी बेदम मारहाण केली. तसेच आम्ही तुमचा पेट्रोल पंप लुटुन नेवु व तुला सोडणार नाही अशी धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणाचा म्हाळुंगे एमआय़डीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story