पिंपरीतील बँक ऑफ बडोदामध्ये शॉट सर्किट, कागदपत्रे जळाली

खराळवाडी भागातील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत शनिवारी पहाटेच्या सुमारास शॉट सर्किट झाले. यामुळे लागलेल्या भीषण आगीत बँकेतील फर्निचर व कागदपत्रे जळून खाक झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 6 May 2023
  • 11:13 am
पिंपरीतील बँक ऑफ बडोदामध्ये शॉट सर्किट

पिंपरीतील बँक ऑफ बडोदामध्ये शॉट सर्किट

पहाटे चारच्या सुमारास लागली होती आग

पिंपरी चिंचवडमधील खराळवाडी भागातील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत शनिवारी पहाटेच्या सुमारास शॉट सर्किट झाले. यामुळे लागलेल्या भीषण आगीत बँकेतील फर्निचर व कागदपत्रे जळून खाक झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराळवाडीतील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला पहाटे चारच्या सुमारास शॉट सर्किटमुळे आग लागली. आग लागताच याची सुरक्षा रक्षकाने अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल होताच जवानांनी आग आटोक्यात आणली.

वेळीच आग आटोक्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बँकेतील फर्निचर आणि कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. यात सुमारे १५ हजार रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest