Corona Virus : मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे – आरोग्य मंत्री

मुंबई, पुणे आणि ठाण्यासह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांबाबत आयोजित केलेल्या विशेष कार्यदलाच्या बैठकीत ते बोलत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sun, 23 Apr 2023
  • 11:00 am
 मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे – आरोग्य मंत्री

मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे – आरोग्य मंत्री

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन

मुंबई, पुणे आणि ठाण्यासह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांबाबत आयोजित केलेल्या विशेष कार्यदलाच्या बैठकीत ते बोलत होते.

डॉ. सावंत म्हणाले की, कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी. आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या मॉकड्रीलमध्ये आढळलेल्या त्रुटींचे तत्काळ निराकरण करावे. मास्कचा वापर करण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात यावे. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कोरोना चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत का याची खात्री करावी, नियमित पर्यवेक्षण करावे, प्रयोगशाळांची क्षमता वाढवावी, अशा सूचना देखील डॉ. सावंत यांनी यावेळी दिल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest