गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडिओ व्हायरल : अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात

नृत्यांगणा गौतमी पाटीलचा २४ फेब्रुवारीला पुण्यात कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमावेळी कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आता एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 3 May 2023
  • 01:40 pm

गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातून मुलाला घेतले ताब्यात

नृत्यांगणा गौतमी पाटीलचा २४ फेब्रुवारीला पुण्यात कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमावेळी कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आता एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

गौतमी पाटीलचा २४ फेब्रवारी पुण्यात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान गौतमी कपडे बदल असतानाचा व्हिडिओ एकाने शूट केला होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली होती. आता तपासामध्ये पुणे पोलिसांना मोठे यश आले आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलाला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story