औषधांच्या नावाखाली अवैध मद्याची विक्री, मुद्देमालासह दोघांना अटक

औषधांच्या नावाखाली अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून ५७ हजार ५२० रुपये किमतीचा वाहनासह मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 25 Apr 2023
  • 10:34 am

औषधांच्या नावाखाली अवैध मद्याची विक्री

राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाची कारवाई

औषधांच्या नावाखाली अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून ५७ हजार ५२० रुपये किमतीचा वाहनासह मुद्देमाल जप्त केला आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मालेगावचे हद्दीत पोलिस गस्त घालत होते. यादरम्यान, संशयित ट्रक, वाहनांची चौकशी करीत असताना एका सहा चाकी ट्रकला थांबवून वाहनामध्ये काय आहे? अशी चालकाकडे पोलिसांनी विचारणा केली. त्यावेळी वाहन चालकाने ट्रकमध्ये औषधे व इंजक्शन असल्याचे सांगितले.

परंतू चालकाने संशयित रीत्या उत्तर दिल्याने वाहन रोडच्या बाजुस घेऊन तपासणी केली असता वाहनामध्ये गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेले इंपेरियल ब्लु व्हिस्की १८० मिली क्षमतेच्या ८६४० सिलबंद बाटल्या (१८० बॉक्स), मेकडावेल नं. १ व्हिस्की १८० मिली क्षमतेच्या २६४० सिलबंद बाटल्या (५५ बॉक्स), रॉयल स्टग व्हिस्की १८० मिली क्षमतेच्या ५५२० सिलबंद बाटल्या (१५५ बॉक्स), रॉयल चायलेंज व्हिस्की १८० मिली क्षमतेच्या ८६४ सिलबंद बाटल्या (१८ बॉक्स), एडरियल व्हिस्की ७५० मिली क्षमतेच्या ३०६० सिलबंद बाटल्या (२५५ बॉक्स) घटनास्थळी मिळून आल्या. त्यानंतर पोलिासांनी मुद्देमालासह ट्रक आणि दोन आरोपींना अटक केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story