ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
गोवा एनसीबीने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत LSD ड्रग्स, ८ ग्राम कोकेन, १६ ग्रॅम हॅश ऑइल, २१० ग्रॅम चरस, १ किलो ४४० ग्रॅम गांजा, लॅपटॉप, मोबाईल्स आणि ४ लाख ६० हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच २ परदेशी नागरिकांसह ३ जणांना अटक केली आहे.
गोवा एनसीबीच्या पथकाला एक महिला आंतरराष्ट्रीय व्यक्तींना ड्रग्ज पोहोचवत असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार सापळा रचून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. यावेळी तिच्याजवळ असलेल्या कागदपत्राची पडताळणी केली असताना सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. तसेच तिच्यासोबत इतर २ ते ३ व्यक्ती सामिल असल्याचे समजले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर २ दोघांनाही सापळा रचून अटक केली. यावेळी त्यांच्याकडून LSD ड्रग्स, ८ ग्राम कोकेन, १६ ग्रॅम हॅश ऑइल, २१० ग्रॅम चरस, १ किलो ४४० ग्रॅम गांजा, लॅपटॉप, मोबाईल्स आणि ४ लाख ६० हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एवढेच नव्हे तर आरोपींच्या घराची झाडाझडती घेतली असता काही औषधी बनवत असल्याचे समोर आले. यावेळी त्याच्या घरातून ३ भांडी देखील जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणी १ परदेशी महिला, १ परदेशी पुरूष आणि आणखी एकाला पोलिसांनी अटक केली. यातील महिला ही १९८०च्या जलतरणात ऑलिंपिक रौप्यपदक विजेती आहे. तर पुरूष रशियातील माजी पोलिस अधिकारी आहे. गेल्या काही वर्षापासून हे गोव्यात वास्तव्यात होते. गोव्यातूनच ते ड्रग्ज पोहोचवायचे.