कार्यकर्त्यांने रक्ताने लिहिले पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार यांनी मंगळवारी अचानक घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत आहेत. अशातच पुण्यातील एका कार्यकर्त्याने आपल्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहिले आहेत.
साहेब प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काळे याने आपल्या स्वतः च्या रक्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात शरद पवार साहेब आपण निर्णय बदलावा असे म्हटले आहे.
कार्यकर्त्याने आपल्या पत्रात म्हटले की, “माझे मार्गदर्शक पवार साहेब मी आपल्या कार्याची माहिती घेऊन आपल्या पक्षाचा कार्यकर्ता झालो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे आपण दैवत आहात. आम्ही कोणाकडे पाहणार? आम्हाला कोण घडवणार? साहेब आपण घेतलेला हा निर्णय कोणालाच मान्य नसून आपल्या या निर्णयाने आम्ही पोरके झालो आहे, आपण आमचे दैवत असून आपण हा निर्णय बदलावा,” अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.