Robbed 63 lakhs : बारामतीत दरोडेखोरांचा प्रताप, महिलेला हात-पाय बांधून ६३ लाखाला लुटले

पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात चार दरोडेखोरांनी महिलेच्या घरात घुसून ५५ लाख रुपये आणि दागिने असे एकूण ६३ लाख रुपयांना लुटल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, दरोडेखोरांनी महिलेच हात-पाय बांधले होते. ही घटना बारामती शहरातील देवकाते नगर पार्क परिसरात रात्री आठच्या सुमारास घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 24 Apr 2023
  • 11:00 am
महिलेला हात-पाय बांधून ६३ लाखाला लुटले

महिलेला हात-पाय बांधून ६३ लाखाला लुटले

६३ लाख रुपये घेऊन चार दरोडेखोरांचा पोबारा

पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात चार दरोडेखोरांनी महिलेच्या घरात घुसून ५५ लाख रुपये आणि दागिने असे एकूण ६३ लाख रुपयांना लुटल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, दरोडेखोरांनी महिलेच हात-पाय बांधले होते. ही घटना बारामती शहरातील देवकाते नगर पार्क परिसरात रात्री आठच्या सुमारास घडली.  

या प्रकरणी पीडित महिला तृप्ती सागर गोफणे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पीडित महिला घरी एकटी असताना चार दरोडेखोर घरात घुसले. त्यानंतर दरोडेखोरांनी महिलेचे हात-पाय बांधले. यावेळी घरातील सुमारे ५५ लाख रुपये रोख रक्कम आणि दागिने असा एकूण ६३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

या घटनेची दखल घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून (एलसीबी) पाच पथके नेमून सखोल तपास केला आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध तपास पद्धतीचा वापर करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest