विमाननगरमधील वेश्या व्यवसायावर पोलीसांचा छापा, ६ महिलांची सुटका

पुण्यातील विमानगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ६ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 4 May 2023
  • 11:23 am
विमाननगरमधील वेश्या व्यवसायावर पोलीसांचा छापा

विमाननगरमधील वेश्या व्यवसायावर पोलीसांचा छापा

मसाज सेंटरच्या मॅनेजरसह ४ जणांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील विमानगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ६ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानगर परिसरातील सॉलीटर बिझनेस हब येथे अमायरा स्पा नावाचे असलेल्या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला ग्राहकाच्या रुपात मसाज सेंटरवर पाठवले.

यावेळी कर्मचारी वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात अडकताच पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली. या कारवाईत एकुण ०६ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणाहून एक मोबाईल व रोख रक्कमेसह एकुण १ लाख २८ हजार ५०० रुपये किमतीचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्पा मॅनेजरला ताब्यात घेवुन आरोपी स्पा चालकांसह इतर ४ जणांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात कलम ३७०, ३४ आणि अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,, ५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या आरोपी व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता विमानतळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest