Arrested : पुण्यातील सराईत चोरट्याला अटक, ११ लाखाचे सोन्याचे दागिने जप्त

पुणे शहरातील विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून २०० ग्रॅम वजनाचे सुमारे ११ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 27 Apr 2023
  • 04:59 pm
पुण्यातील सराईत चोरट्याला अटक

पुण्यातील सराईत चोरट्याला अटक

चोरट्यावर घरफोडीचे ८० गुन्हे दाखल असल्याचे उघड

पुणे शहरातील विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून २०० ग्रॅम वजनाचे सुमारे ११ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

जयवंत उर्फ जेडी गवर्धन गायकवाड (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेडीवर पुणे शहर परिसरात केलेल्या घरफोडीचे ८० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडी मंगळवारी पुण्यातील भूमकर चौकात घरफोडीच्या साहित्यासह असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जेडीला अटक केली. यावेळी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्यावर जवळपास ८० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. तसेच त्याच्याकडून सांगवी, सिंहगड रोड, दळेगाव दाभाडे परिसरात चोरी केलेले २०० ग्रॅम वजनाचे सुमारे ११ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story