सासवड रस्त्यावर बसची कारला धडक, जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

सासवड रस्त्यावरील वडकी गावाजवळ खासगी बसने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 4 May 2023
  • 10:00 am
सासवड रस्त्यावर बसची कारला धडक

सासवड रस्त्यावर बसची कारला धडक

भरधाव खासगी बसने कारला दिली धडक

सासवड रस्त्यावरील वडकी गावाजवळ खासगी बसने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.

विजय गुंडू शिरगुरे असे मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव असून ते हडपसर येथील रहिवासी आहेत. तसेच मयूर विजय शिरगुरे, त्यांचा मुलगा सम्यक आणि त्यांची बहीण ज्योती जितेंद्र गुंडप्पाणकर हे तिघे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरीकाची मुलगी अनुषा विजय शिरगुरे हिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, शिरगुरे कुटुंब कारने पुण्याच्या दिशेने जात होते. या दरम्यान, वडकी गावाजवळ दिवे घाटाच्या पायथ्याशी भरधाव वेगात असलेल्या एका खासगी बसने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघात एतका भीषण होता की यात विजय शिरगुरे यांचा मृत्यू झाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest