रमजान ईदनिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल
रमजान ईद निमित्त मुस्लीम बांधव मशिद व ईदगाह मैदानावर / सार्वजनिक ठिकाणी सामुहिक नमाज पठण करून ईद साजरी करतात. त्यावेळी ईदगाहचे जवळपास मोठया प्रमाणावर वाहनांची गर्दी होते. त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरीता दिनांक २२ आणि २३ एप्रिल रोजी पुण्यातील वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे.
१. सोलापूर रोडने मम्मादेवी चौक येथे येणारी वाहतूक ही गोळीबार चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग- मम्मादेवी चौक बिशप स्कुल मार्गे किंवा कमांड हॉस्पीटल मार्गे डाव्हर्शन करुन पुढे इच्छित स्थळी किंवा नेपिअर रोडने पुढे सीडीओकडे जातील.
२. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा नमाजपठणाच्या वेळी वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग- गोळीबार चौकातून डाव्याबाजूस वळून सीडीओ चौकातून पुढे उजवीकडे वळून गिरीधर भवन चौकात जातील. पुढे उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातुन इच्छित स्थळी जातील.
३. सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतुक नमाज पठण काळात वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग- लुल्लानगरकडुन येवुन खाण्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतुक खटाव बंगला चौक - नेपीयर रोड मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक - भैरोबानाला येथून किंवा गिरीधर भवन चौकातून इच्छित स्थळी जातील.
४. सेव्हन लव्हज चौक कडून गोळीबार मैदानकडे येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग- सॅलेसबरी पार्क - सी.डी.ओ. चौक - भैरोबानाला येथुन इच्छित स्थळी जातील.
५. भैरोबानाला ते गोळीबार मैदानकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथून वळविण्यात येऊन एम्प्रेसगार्डन व लुल्लानगरकडे सोडण्यात येईल.
पर्यायी मार्ग- प्रिन्स ऑफ वेल्स रोडने किंवा भैरोबानाला - वानवडी बाजार चौक येथून इच्छित स्थळ जातील.
६. कोंढवा परीसरातून गोळीबार मैदानाकडे येणाऱ्या सर्व जड मालवाहतूक वाहने, जड प्रवासी बसेस, प्रवासी एस टी बसेस, पीएमटी बसेस यांना प्रवेश बंद करण्यात येईल.