Bharat Gaurav train : भारत गौरव ट्रेन पुण्यावरून रवाना, रावसाहेब दानवेंनी दाखवला हिरवा झेंडा

केंद्र सरकारच्या 'देखो अपना देश' आणि 'एक भारत, श्रेष्ठ भारत' उपक्रमाअंतर्गत चालवल्यात जात असलेली भारत गौरव ट्रेन आज पुण्यावरून रवाना झाली आहे. या ट्रेनला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवला. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 28 Apr 2023
  • 04:25 pm
भारत गौरव ट्रेन पुण्यावरून रवाना

भारत गौरव ट्रेन पुण्यावरून रवाना

कोलकाता, प्रयागराज, काशीसह अन्य भारतातील शहरांमध्ये जाणार

केंद्र सरकारच्या 'देखो अपना देश' आणि 'एक भारत, श्रेष्ठ भारत' उपक्रमाअंतर्गत चालवल्यात जात असलेली भारत गौरव ट्रेन आज पुण्यावरून रवाना झाली आहे. या ट्रेनला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवला. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते.

पुण्यावरून रवाना झालेली भारत गौरव ट्रेन कोलकाता, प्रयागराज, काशीसह अन्य भारतातील शहरांमध्ये जाणार आहे. ही ट्रेन जवळपास नऊ रात्र आणि १० दिवस चालणार आहे. या ट्रेनमध्ये विविध प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. तसेच IRCTC ने या टूरसाठी सर्वसाधारणसाठी १५,९०० रुपये, कम्फर्टसाठी २७,९०० रुपये आणि डिलक्ससाठी ३३,३०० रुपये अशी तीन पॅकेजेस जाहीर केली आहेत.

दरम्यान, पुण्याहून पुढील भारत गौरव ट्रेन ११ मे रोजी रवाना होईल. ती उत्तर भारतातील आग्रा, अमृतसर, हरिद्वार, मथुरा, ऋषिकेश, उज्जैन आणि वैष्णो देवी मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळे असलेल्या शहरांत जाणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story